Advertisement

केडीएमसीचे कंत्राटी कामगार संपावर

आयुक्तांच्या आश्वासनानंतरही पगार न झाल्यामुळे केडीएमसीच्या कंत्राटी कामगारांनी सोमवारी सकाळपासून संप सुरू केला आहे. कंत्राटी कामगारांमध्ये सफाई कामगार आणि घंटा गाडीवरील वाहन चालकांचा समावेश आहे.

केडीएमसीचे कंत्राटी कामगार संपावर
SHARES

केडीएमसीच्या कंत्राटी कामगारांनी पुन्हा संपाला सुरुवात केली आहे. या कामगरांनी काही दिवसांपूर्वी संप पुकारला होता. त्यावेळी आयुक्तांनी संध्याकाळपर्यंत सर्व कामगारांचा पगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आयुक्तांच्या आश्वासनानंतरही पगार न झाल्यामुळे कंत्राटी कामगारांनी सोमवारी सकाळपासून संप सुरू केला आहे. कंत्राटी कामगारांमध्ये सफाई कामगार आणि घंटा गाडीवरील वाहन चालकांचा समावेश आहे. त्यामुळे कचराप्रश्न गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

केडीएमसीच्या कंत्राटी कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे डोंबिवलीच्या खंबालपाडा डेपोमधून एकही कचऱ्याची गाडी बाहेर पडलेली नाही. या ठिकाणी कर्मचारी ठिय्या आंदोलन करत आहेत.


म्हणून पुन्हा पुकारला संप

कल्याण-डोंबिवली परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापलिकेनं कंत्राट दिलं आहे. परंतु, संबंधित ठेकेदाराने या कामगारांचे पगार थकवल्यानं 'केडीएमसी'च्या कामगारांनी आंदोलन केलं होतं. त्यावेळी संध्याकाळपर्यंत कामगारांचे पगार देण्याचं आश्वासन 'केडीएमसी'चे आयुक्त पी. वेलारासू यांनी दिलं. या आश्वासनामुळे कामगारांनी हा संप स्थगित केला होता. मात्र, अजूनही पगार झाला नसल्यामुळे कामगारांनी पुन्हा एकदा संप पुकारला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा