संघटनांचे सदस्य नसलेली हॉटेल्स होणार टार्गेट, महापालिकेचा इशारा


SHARE

कमला मिल आगीच्या दुर्घटनेनंतर हॉटेल्स संघटनांचं महत्व वाढविण्याचा निर्धार महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केला आहे. हॉटेलमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजनांतर्गत सुरक्षेची काळजी घेणाऱ्या हॉटेल्सना सदस्यत्व देण्याच्या सूचना करतानाच सदस्य नसलेल्या हॉटेल्सवर प्रथम कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात येत आहे. त्यामुळे हॉटेल्सवरील कारवाईत संघटनांचे सदस्य नसलेल्या हॉटेल्सना पहिल्या टप्प्यात टार्गेट करत कारवाई केली जाणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे.


संघटनांसोबत बैठक

मुंबईतील उपहारगृहांमध्ये अग्निसुरक्षेशी संबंधित नियमांचं तसेच आरोग्य व इमारत विषयक नियमांचं परिपूर्ण पालन व्हावं उपहारगृहे अधिकाधिक सुरक्षित चांगल्या दर्जाची व्हावीत, या उद्देशाने 'आहार', 'नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया' आणि 'हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया' या संघटनांची विशेष बैठक महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.


नियमांचं पालन करणाऱ्यांच सदस्यत्व

या बैठकीदरम्यान अग्निसुरक्षा, आरोग्य व इमारतीबाबत असणाऱ्या विविध नियमांचं पालन करणाऱ्यांनाच या संघटनांनी सदस्यत्व द्यावं, अशी सूचना महापालिका आयुक्तांनी मांडली. या सूचनेचं स्वागत करत उपस्थित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या सूचनेचा स्वीकार करण्याचं आश्वासन दिलं होतं.


संघटनांचा काय फायदा?

मात्र, मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत हॉटेल संघटना काय फायदा मिळेल, असा प्रश्न संघटनानी उपस्थित केला. त्यावर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी, जी हॉटेल्स आपल्या संघटनांचे सदस्य नाहीत, त्यावर प्रथम कारवाई केली जाईल आणि दुसऱ्या टप्प्यात अग्निसुरक्षेची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कारवाई करू. जेणेकरून कारवाईच्या भीतीने ही हॉटेल्स आपले सदस्य होतील आणि हे सदस्यत्व देताना तुम्ही अशाप्रकारची अट घालावी. म्हणजे कारवाईच्या भीतीने ते सदस्य होतील आणि महापालिकेला जे अभिप्रेत आहे, तेही साध्य होईल, अशी चर्चा झाल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होणाऱ्या हॉटेल्सना टार्गेट केलं जात असलं तरी येत्या दिवसांत हॉटल्स संघटनांचे सदस्य नसलेल्या हॉटेल्सवर कारवाई होण्याची शक्यता आहे.हेही वाचा-

कमला मिल आग: प्रत्येक दोषीवर कारवाई करा, माजी पोलिस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांची याचिका

कमला मिल आग: महापालिकेच्या ५ अधिकाऱ्यांचं निलंबनसंबंधित विषय