Advertisement

कमला मिल आग: प्रत्येक दोषीवर कारवाई करा, माजी पोलिस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांची याचिका


कमला मिल आग: प्रत्येक दोषीवर कारवाई करा, माजी पोलिस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांची याचिका
SHARES

नवर्षाच्या सुरूवातीलाच कमला मिल कंपाऊंडमधील वन अबोव्ह पब व मोजोस बिस्ट्रो पबला लागलेल्या आगीप्रकरणी पोलिसांनी पब मालक व व्यवस्थापकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा करत दोषींना अटक केली आहे. तरी शहरातील सर्व पबचं फायर आॅडिट व्हावं, या आगीची चौकशी करण्यासाठी विशेष एसआयटी पथक नेमून दोषींवर कारवाई करण्यात यावी. याबाबत उच्च न्यायालयात माजी पोलिस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.


काय आहे मागणी?

लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमधील ट्रेड हाऊस येथील वन अबोव्ह व मोजोस बिस्ट्रो हे पब बेकायदेशीर असून त्यांच्याकडे आग प्रतिबंधक साधने नव्हती. तरीही राजरोसपणे हे पब सुरू होते. त्यामुळे अग्निशमन दलाने त्या त्या विभागातील पब, बार, हाॅटेल आणि रेस्टाॅरंटचं फायर आॅडिट करावं. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महापालिकेने त्या त्या विभागात विशेष अधिकारी नेमावेत. तसेच या आगीची चौकशी करण्यासाठी पोलिसांच्या सहआयुक्त पदाच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांने करावी.

जेणेकरून या प्रकरणात प्रत्येक दोषीवर गुन्हा नोंदवून त्यावर कारवाई व्हावी, अशी विनंती करणारी फौजदारी जनहित याचिका माजी पोलिस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.



हेही वाचा-

कमला मिलचा चौकशी अहवाल शुक्रवारी सादर होणार

कमला मिल आग: मोजोस बिस्ट्रोचे मालक युग पाठकला अटक


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा