लोखंडवालात प्रशस्त रस्त्याचं काम मार्गी

 Andheri
लोखंडवालात प्रशस्त रस्त्याचं काम मार्गी
लोखंडवालात प्रशस्त रस्त्याचं काम मार्गी
लोखंडवालात प्रशस्त रस्त्याचं काम मार्गी
See all

लोखंडवाला कॉम्पलेक्स - कांदिवली पूर्वेकडील लोखंडवाला कॉम्पलेक्स येथील 120 फूट रस्त्याच्या कामाचं गुरुवारी भूमिपूजन करण्यात आलं. या रस्त्यामुळे अरूंद रस्ते आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी यातून कांदिवलीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महिंद्रा कंपनीने 120 फूट रस्ता तयार करण्यासाठी काही जागा सोडली आहे. त्यामुळे लोखंडवाला रस्ता 120 फूट रुंद होऊ शकेल. या रस्त्याच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी स्थानिक नगरसेविका अजंता यादव, राजपती यादव आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Loading Comments