Advertisement

कांजूरमार्ग कारशेड पुन्हा वादात

मेट्रो 6 कारशेडच्या कामावर न्यायालयाने बंदी घातली आहे

कांजूरमार्ग कारशेड पुन्हा वादात
SHARES

मुंबई (mumbai) महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) कांजूरमार्ग (kanjurmarg) येथील 'स्वामी समर्थ नगर-विक्रोळी मेट्रो 6' कारशेड (metro carshed) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. 'मेट्रो 6' कारशेडसाठी कांजूर मार्गाची जागा एमएमआरडीएकडे हस्तांतरित करण्याच्या मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला आक्षेप घेत केंद्र सरकारने पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

यासंदर्भातील केंद्र सरकारच्या याचिकेवर गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने कारशेडचे काम ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले आहे. अशा परिस्थितीत कांजूरमार्ग कारशेडचा प्रश्न मार्गी लागल्याचे दिसत असतानाच तो पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कारशेड बंद झाल्याने मेट्रो 6 मार्गावर परिणाम होणार आहे.

2016 मध्ये 'मेट्रो 6' मार्गासाठी कांजूरमार्ग येथे कारशेड बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भातील प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरीही दिली होती. उद्धव ठाकरे यांच्या निर्णयानंतर केंद्र सरकार आणि मिठागर आयुक्तांनी तेथे कारशेड बांधण्यास हरकत घेत, जागेवर मालकी हक्क दाखवत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

राज्य सरकारने जागेच्या मालकीचा दावा केला आणि संपूर्ण कांजूरमार्ग कारशेड वादात सापडला. एका खासगी विकासकानेही या जागेवर दावा करत कोर्टात धाव घेतली. मात्र, युतीचे सरकार आल्यानंतर त्यांनी 'मेट्रो 3'चे कारशेड कांजूरमार्ग ते आरे परिसरात हलवले. यानंतर 2022 मध्ये कांजूरमार्गच्या जागेचा वाद मिटला होता.

हा वाद मिटल्यानंतर मेट्रो 6 च्या कारशेडसाठी कांजूरमार्गातील 15 हेक्टर जमीन एमएमआरडीएकडे हस्तांतरित करण्यात आली होती. जागा ताब्यात घेतल्यानंतर एमएमआरडीएने निविदा प्रक्रिया पूर्ण करून कारशेडच्या कामाचे कंत्राट दिले आणि नुकतेच काम सुरू करण्यात आले होते.

मात्र, आता गुरुवारपासून हे काम बंद करण्यात आले आहे. कांजूरमार्ग येथील कारशेडची जागा ‘जैसे थे’ ठेवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने गुरुवारी एमएमआरडीएला दिले. त्यामुळे कारशेडचे काम पुन्हा ठप्प झाले असून त्यामुळे एमएमआरडीएची चिंता वाढली आहे.

कारशेडचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची एमएमआरडीएची योजना आहे. मात्र, आता कारशेडचे काम पुन्हा विस्कळीत झाले आहे.



हेही वाचा

गोरेगाव-मुलुंड बोगद्यासाठी 1,500 हून अधिक झाडांवर कुऱ्हाड

बॉम्बे हायकोर्टाने पालिकेला फेरीवाला नियंत्रणावरून फटकारले

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा