गिरगावात रंगला 'कट्टर गिरगावकर' सोहळा

Girgaon
गिरगावात रंगला 'कट्टर गिरगावकर' सोहळा
गिरगावात रंगला 'कट्टर गिरगावकर' सोहळा
गिरगावात रंगला 'कट्टर गिरगावकर' सोहळा
गिरगावात रंगला 'कट्टर गिरगावकर' सोहळा
See all
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक
मुंबई  -  

गिरगाव म्हणजे मराठी संस्कृतीची खाण. राजकारणापासून, कला, क्रीडा, संगीत, चित्रपट अशा अनेक क्षेत्रांतील रत्न या गिरगावात राहत आहेत. या कट्टर गिरगावकरांच्या रंगतदार स्वाभिमान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात गिरगावची नव्याने ओळख झाली. मानबिंदूचा 'कट्टर गिरगावकर' हा गौरव सोहळा गिरगावच्या साहित्य संघ मंदिर येथे पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केले होते.

कार्यक्रमाची सुरुवात मॅजेस्टिकचे अशोक कोठावळे आणि हेमंत कर्णिक यांच्या साहित्य गप्पांनी झाली. गिरगावात प्रमुख प्रकाशन संस्था असल्याने तिथे लेखकांच्या गप्पा कशा रंगायच्या यावर अशोक कोठावळे यांनी भाष्य केले.

यावेळी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, उपनेत्या मीना कांबळी, उपनेते राजकुमार बाफना, रवींद्र मिर्लेकर, माई परब, सुरेंद्र बागलकर, मीनल जुवाटकर यांच्यासह शुभा खोटे, विजू खोटे, प्रदीप पटवर्धन, सुरेंद्र शंकरशेट, विलास शंकरशेट, अशोक कोठावळे, हेमंत कर्णिक, निळू दामले, अरुण पुराणिक, मकरंद भोसले, दिलीप ठाकूर, आनंद पेडणेकर, ज्येष्ठ माजी कसोटीपटू माधव आपटे, क्रिकेट प्रशिक्षक विद्याधर पराडकर, रिमा लागू यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.