Advertisement

५ किलो प्लॅस्टिक द्या आणि भरपेट पोळीभाजी खा, KDMCची नवी संकल्पना

कल्याण-डोंबिवली शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी महापालिकेकडून एक नवीन मोहीम हाती घेण्यात आली आहे.

५ किलो प्लॅस्टिक द्या आणि भरपेट पोळीभाजी खा, KDMCची नवी संकल्पना
SHARES

कल्याण-डोंबिवली शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी महापालिकेकडून एक नवीन मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्लास्टिकचे संकलन चांगलं व्हावं, प्लास्टिकचे हँडओव्हर चांगलं व्हावे आणि प्लॅस्टिकमुळे होणारं प्रदूषण टाळता यावं यासाठी पालिकेकडून भन्नाट मोहीम सुरू करण्यात आली आहे.

या मोहिमेअंतर्गत ५ किलो प्लास्टिक जमा करा आणि त्याच्या मोबदल्यात पोळीभाजी मिळावा अशी संकल्पना पालिकेनं राबवली आहे. महापालिकेअंतर्गत सिद्धी वेस्ट टू ग्रीन लिमिटेड आणि तृप्ती गृह उद्योगाच्या संयुक्तविद्यमानं ही मोहीम पालिकेनं हाती घेतली आहे. या मोहीमेसाठी नागरिकांनी उदंड प्रतिसाद द्यावा आणि शहरं प्लास्टिकमुक्त करावं असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे.

दरम्यान, याच वर्षी १ मार्चपासून मुंबई महापालिकेनं प्‍लास्टिक वापरावर (Action On Plastic Use) कडक कारवाई करण्‍याचा निर्णय घेतला होता. मुंबईतील नागरिक, व्यापारी, फेरीवाले यासह‍ सर्वांनी प्रतिबंधित प्‍लास्टिकचा वापर करू नये, असं आवाहन प्रशासनानं केलं होतं.

राज्‍याचे पर्यावरण मंत्री आदित्‍य ठाकरे यांनी महाराष्‍ट्रात प्रतिबंधित प्‍लास्टिकचा वापर रोखण्‍यासाठी कारवाई तीव्र करण्‍याचे निर्देश दिले होते. मे २०२० पर्यंत संपूर्ण महाराष्‍ट्र प्रतिबंधित प्लास्टिक मुक्‍त करण्‍याचं लक्ष्‍य निश्चित केलं होतं. त्यानुसार अद्यापही अनेक महापालिका प्लास्टिकचा वापर बंद करण्यासाठी अशा विविध मोहिमा राबवून काम करत आहेत.हेही वाचा

पाणी पुरवठा कर न भरलेल्यांवर ठाणे महापालिकेची कारवाई

कोस्टल रोडमधील बोगदा खणण्याचे काम ७ जानेवारीपासून

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा