Advertisement

कोस्टल रोडमधील बोगदा खणण्याचे काम ७ जानेवारीपासून

या प्रकल्पात मलबार हिल टेकडी, गिरगाव चौपाटी खालून समांतर असे दोन सर्वात मोठे भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी चीनहून बोगदा खणणारे यंत्र आणण्यात आले आहे.

कोस्टल रोडमधील बोगदा खणण्याचे काम ७ जानेवारीपासून
SHARES

मुंबई महापालिकेचा बहुचर्चित प्रकल्प असलेल्या कोस्टल रोड (सागरी किनारा मार्ग) चे १७ टक्के काम पूर्ण झालं आहे. या प्रकल्पात मलबार हिल टेकडी, गिरगाव चौपाटी खालून समांतर असे दोन सर्वात मोठे भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी चीनहून बोगदा खणणारे यंत्र आणण्यात आले आहे. या यंत्राचे मावळा असे नामकरण करण्यात आले असून जमीनीखाली हे यंत्र उतरवल्यानंतर ७ जानेवारीपासून बोगदा खणण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.

कोस्टल रोड प्रकल्पासाठी १२,७२१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी आतापर्यंत  १२८१ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र न्यायालयीन प्रकरणे आणि टाळेबंदी यामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्याची मुदत पुढे गेली आहे.हा प्रकल्प आता जुलै २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य मुंबई महापालिकेने ठेवलं आहे.

प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सी लिंकच्या दक्षिण टोकापर्यंत कोस्टल रो़ड तयार केला जात आहे.  या मार्गाची  लांबी १०.५८ किलोमीटर असणार आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाचे काम २०२२ मध्ये पूर्ण होणार होते. मात्र जुलै २०१९ मध्ये उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे सात महिने या प्रकल्पाचे काम पूर्ण थांबले होते.

त्यानंतर लाॅकडाऊनमुळे हे काम रखडले होते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून या कामाने वेग घेतला आहे. या प्रकल्पासाठी मोठय़ा प्रमाणावर समुद्रात भराव टाकू न जमीन तयार केली जात आहे. १७५ एकर (७०.८२ हेक्टर) जमीन आतापर्यंत भराव घालून तयार करण्यात आली आहे.



हेही वाचा -

राजहट्ट व बालहट्टासाठीच मेट्रो कारशेडची जागा बदलली- किरीट सोमैय्या

ब्रिटन, आखाती देशांतून येणाऱ्या प्रवाशांना सक्तीने क्वारंटाइन, मुंबई महापालिकेचा निर्णय


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा