Advertisement

नियमांचं उल्लंघन भोवलं, कल्याणमधील दोन मंगल कार्यालयांना टाळं

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने लागू केलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या दोन मंगल कार्यालयांना कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने टाळं ठोकलं आहे.

नियमांचं उल्लंघन भोवलं, कल्याणमधील दोन मंगल कार्यालयांना टाळं
SHARES

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने लागू केलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या दोन मंगल कार्यालयांना कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने टाळं ठोकलं आहे. ही कार्यालये ३० एप्रिलपर्यंत बंद करण्यात आली आहेत. तसंच मोकळ्या जागेत १५० वऱ्हाडींच्या उपस्थितीत विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या वधू-वरांच्या पित्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत रोज दीड हजारांच्या आसपास कोरोना रुग्ण आढळत आहेत. कोरोनाचा वाढता फैलाव आटोक्यात आणण्यासाठी पालिका, पोलिसांनी कठोर निर्बंध लागू केले आहेत. ५० जणांच्या उपस्थितीतच लग्न सोहळा पार पाडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, काही मंगल कार्यालय चालक, विवाह सोहळ्यांचे आयोजक शासनाचे आदेश न पाळता गर्दी जमवून कार्यक्रम करत असल्याचं आढळलं आहे.  नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कल्याणमधील भवानी आणि वैष्णवी ही दोन मंगल कार्यालये पोलिसांनी मंगळवारी टाळे ठोकून बंद केली आहेत.

या मंगल कार्यालयांमध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक सुनील वायले, नगरसेविका शालिनी वायले आणि सुरेश गंगाराम म्हात्रे (रा. डोंबिवली) यांच्या मुलींचे विवाह सोहळे एक हजार वऱ्हाडींच्या उपस्थितीत धडाक्यात साजरे करण्यात आले होते. ही दोन्ही मंगल कार्यालये ३० एप्रिलपर्यंत बंद करण्यात आली आहेत. 

याशिवाय, कल्याण-शिळ फाटा रस्त्यावरील कोळेगाव येथे सेंट मेरी शाळेजवळ मोकळ्या जागेत १५० वऱ्हाडींच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पाडला. त्यामुळे वधू-वरांचे वडील नामदेव सखाराम पाटील (रा. नांदिवली), शंकर जोशी (रा. चिंचपाडा) यांच्याविरुद्ध ई प्रभाग अधिकारी भारत पवार, मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. पी. वणवे यांनी गुन्हे दाखल केले आहेत.



हेही वाचा -

मुंबई महापालिकेची नवी गाइडलाइन; आता 'या' गोष्टींनाच परवानगी

आता खासगी ऑफिसातही मिळणार कोरोना लस

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा