शांतता आणि स्वच्छता राखा- स्नेहल आंबेकर


SHARE

दादर - बेस्ट उपक्रमातर्फे 60 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुरवण्यात येणाऱ्या विविध सेवासुविधांचं उद्घाटन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते झालं. शिवाजी पार्क जवळ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमात महापौर स्नेहल आंबेकर यांनी आंबेडकर अनुयायांना शांतता आणि स्वच्छता राखण्याचं आवाहन केलं. 

या वेळी उपमहापौर अलका केरकर, शिक्षण समिती अध्यक्षा हेमांगी वरळीकर, नगरसेविका समिता कांबळे तसेच सर्वश्री बेस्ट समिती अध्यक्ष मोहन मिठबावकर, बेस्ट समिती सदस्य संदेश कोंडविलकर आदी उपस्थित होते. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या