Advertisement

मुंबईत उगवतंय 'सिटी फाॅरेस्ट'


SHARES

काँक्रीटच्या जंगलात हिरवं जंगल लुप्त होत असताना 'केशवसृष्टी' या संस्थेने मुंबईत 'सिटी फाॅरेस्ट' ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमेंतर्गत ‘केशवसृष्टी’ मुंबईतील मोकळ्या जागेत घनदाट जंगल उभारणार आहे. यासाठी 'अकिरा मियावाकी' या जापनीज टेक्नाॅलाॅजी पद्धतीचा वापर केला जात आहे. या पद्धतींतर्गत १५०० ते २००० चौरस फुटांच्या जागेवर अवघ्या २ ते ३ वर्षांत जंगल उभं राहू शकतं. या अंतर्गत जंगलाची वाढ दहापट अधिक वेगाने होते. 

 

या जंगलात लावलेल्या झाडांमध्ये कार्बन डायऑक्साइड शोषून घेण्याची क्षमता तीसपट अधिक असल्याचं जाणकार सांगतात. शिवाय हे जंगल उभारण्यासाठी खर्चही कमी येतो. या संकल्पनेअंतर्गत आतापर्यंत भाईंदरमध्ये २, गोरेगाव, मालाड, कांदिवली, जोगेश्वरी आणि अंधेरी इथं प्रत्येकी एक 'सिटी फाॅरेस्ट' उभं करण्यात आलं आहे.  हेही वाचा-

गणेशोत्सव २०१९: गणपती बाप्पाची मिरवणूक यंदा लांबणार

‘अशी’ रंग बदलते ‘CSMT’ची इमारत!संबंधित विषय
Advertisement