‘अशी’ रंग बदलते ‘CSMT’ची इमारत!

रंगसंगतीचा अनोखा मिलाफ वर्षातल्या काही विशेष दिनामिनित्त टर्मिनसच्या इमारतीवर पाहायला मिळतो. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देखील टर्मिनसच्या इमारतीवर तिरंग्याची अशीच प्रकाशयोजना पाहायला मिळते.

SHARES

दररोज लाखो प्रवासी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर उतरतात. वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, वंशांचे आणि रंगीबेरंगी पेहरावातले. या रंगसंगतीचा अनोखा मिलाफ वर्षातल्या काही विशेष दिनामिनित्त टर्मिनसच्या इमारतीवर पाहायला मिळतो. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देखील टर्मिनसच्या इमारतीवर तिरंग्याची अशीच प्रकाशयोजना पाहायला मिळते.

पर्यटकांची गर्दी

युनिस्कोने हेरिटेज साईटचा दर्जा दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस(CSMT)ला बघायला दररोज शेकडो पर्यटक मुंबईत दाखल होतात. दिवसाच्या उजेडात या इमारतीचं रूप जितकं आकर्षक दिसतं. त्यापेक्षाही कित्येक पटीने जास्त रात्रीच्या प्रकाशयोजनेत ही इमारत लक्षवेधी ठरते. त्यामुळे रात्रीच्या वेळेत प्रकाशयोजनेने नटलेली ही इमारत कॅमेराबद्ध करण्यासाठी पर्यटकांची इथं गर्दी होते. 

'असे' बदलतात रंग

२०१४ रेल्वे प्रशासनाने एमटीडीसीच्या मदतीने ५ कोटी खर्च करत १ हजारहून जास्त मल्टी कलर एईडी लाईट इमारतीवर बसवल्या आहेत. या लाईटमुळे एरवी सोनेरी रंगात उजळून निघणारी ही इमारत सप्तरंगात सजू लागली. ‘बीएमएक्स’ टेक्नाॅलाॅजीच्या मदतीने २० विशेष दिनाच्या निमित्ताने इमारतीवरील रंग बदलले जातात.


'हे' दिन विशेष

त्यात नवीन वर्ष, प्रजासत्ताक दिन, ईद, नवरात्र, दिवाळी, जागतिक महिला दिन, पर्यावरण दिन या दिवसांचा समावेश आहे. सोबतच काही संस्थांनी विनंती केल्यास त्यानुसार देखील इमारतीवर प्रकाशयोजना केली जाते.

हा ट्रेण्ड फाॅलो करत महापालिका, मंत्रालय अशा इमारतींवरही आता प्रकाशयोजना केली जाऊ लागलीय. त्यामुळं एरवी अंधारात असणारा दक्षिण मुंबईचा फोर्ट परिसर रात्रीच्या वेळेत चांगलाच रंगीबेरंगी दिसू लागलाय.हेही वाचा-

राखीनंतर आता सीड तिरंग्याची क्रेझ, साजरा करा पर्यावरणपूरक स्वातंत्रदिन

गणेशोत्सव २०१९ : बाप्पाला 'कॅनव्हास'ची सजावटसंबंधित विषय