Advertisement

राखीनंतर आता सीड तिरंग्याची क्रेझ, साजरा करा पर्यावरणपूरक स्वातंत्रदिन

तिरंग्याचा होणारा अपमान रोखण्यासाठी अनेक जण पुढे सरसावले आहेत. आम्ही अशाच काही संस्थांची नावं सांगणार आहोत जिथून तुम्ही सीड तिरंगा खरेदी करू शकता.

राखीनंतर आता सीड तिरंग्याची क्रेझ, साजरा करा पर्यावरणपूरक स्वातंत्रदिन
SHARES

प्रत्येक भारतीयाला आपल्या देशाबद्दल आणि स्वातंत्र्याची निशाणी असलेल्या तिरंगी ध्वजाबद्दल कमालीचा अभिमान आहे. असं असलं तरी १५ ऑगस्ट होताच ठिकठिकाणी हे झेंडे पडलेले दिसून येतात. एकप्रकारे हा झेंड्याचा अपमानच झाला. कित्येकदा या झेंड्यांचं करायचं काय हे देखील कुणाला माहित नसतं. तिरंग्याचा होणारा अपमान रोखण्यासाठी अनेक जण पुढे सरसावले आहेत. आम्ही अशाच काही संस्थांची नावं सांगणार आहोत जिथून तुम्ही सीड तिरंगा खरेदी करू शकता


) पेपर सीड

पेपर सीडच्या उत्पादकांचा असा विश्वास आहे की, कचऱ्याचा ढीग कमी करायचा प्रभावी मार्ग म्हणजे एक तर असं काही बनवू नका किंवा बनवलंच तर त्याचा पुनर्वापर करा.


 पेपर सीड उत्पादकांनी दुसरा पर्याय निवडला. त्यानुसार पेपर सीड्स पर्यावरणास अनुकूल अशी उत्पादने आहेत. त्यापैकीच एक म्हणजे बियाणेयुक्त तिरंगा. हा तिरंगा कुंडीमध्ये टाकलात आणि रोज पाणी दिलं की छोटं रोपटं तयार होईल.


) गिफ्ट ग्रीन

'मला टाकू नका तर वाढवा' या टॅगलाईन अंतर्गत गिफ्ट ग्रीन सीड पेपरपासून अनेक पर्यावरणास अनुकूल अशी उत्पादनं तयार करतं. तिरंगा, डायरी, व्हिजिटिंग कार्ड, आमंत्रण पत्रिका या सर्वांचा त्यात समावेश आहे.  

सीडपासून उत्पादनं बनवताना ते टॉमेटो, बासील, हर्ब्स, भाज्या आणि फुल यांच्या बियाणांचा वापर करतात. भारतीय वातावरणात पटकन वाढतील अशाच सीड्सचा वापर ते करतात.


) री-राईट

प्लॅस्टिक कचरा कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने, री-राइट सीड्स पेपरपासून बनवलेल्या झेड्यांची विक्री करते. त्यांनी बनवलेल्या झेंड्यांमध्ये विशेषत: तुळशी बिया असतात. कारण वनस्पती पवित्र मानली जाते. त्यांच्यानुसार, देशावर आणि निसर्गावर प्रेम करणारेच खरे देशभक्त आहेत


) श्रुती धडीच


फक्त एखादी संस्थाच नाही तर व्यक्ती देखील या चांगल्या कार्याला हातभार लावू शकतो. मुंबईत राहणारी श्रुती धडीच देखील सीडपासून बनलेल्या तिरंग्याची विक्री करते. सीड तिरंगा ती जयपूरमधून मागवते. याची किंमत फक्त १० रुपये आहे


) चिनू कवात्रा

'दादर बीच बीच क्लीन अपउपक्रमासाठी ओळखला जाणारा चिनू कवात्रा आपल्या इतर पर्यावरणविषयक उपक्रमांतून खूपच सक्रीय आहे. तो देखील सीड पेपरपासून बनवण्यात येणारा तिरंगा विकतो. एका तिरंग्यामागे तो २० रुपये आकारतो.

पर्यावरणाचा समतोल राखत १५ ऑगस्ट साजरा केला जाऊ शकतो. फक्त तुमची तसं करण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे. चला तर मग संकल्प करूया याव र्षीपासून पर्यावरणास अनुसरून सण साजरे करूयातहेही वाचा

तिरंग्याबद्दल 'या' १४ गोष्टी प्रत्येक भारतीयाला माहीत असायला हव्यात!
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement