Advertisement

केतन तिरोडकर यांना तीन महिन्यांची कैद


केतन तिरोडकर यांना तीन महिन्यांची कैद
SHARES

न्यायाधीशांवर आरोप करणारी फेसबुक पोस्ट लिहून न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं पत्रकार व अनेक जनहित याचिका करणारे केतन तिरोडकर यांना तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.


न्यायाधीशांबाबत आक्षेपार्ह पोस्ट 

केतन तिरोडकर यांची फेसबुक पोस्ट ही न्यायालयाचा अवमान आहे, असा निष्कर्ष नोंदवून न्यायमूर्ती अभय ओक, न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती राजेंद्र सावंत यांच्या विशेष खंडपीठाने त्यांना तीन महिन्यांची कैद व दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी न्यायालयानं न्यायाधीशांबाबत केलेली आक्षेपार्ह पोस्ट तिरोडकर याच्या फेसबुक पेजवरून काढून टाकण्याचे आदेश दिले होते.


वठणीवर आणावंच लागेल

'न्यायालये आणि न्यायाधीश न्यायदानाचे पवित्र काम करत असतात. तसंच, न्यायाधीशही माणूसच असल्यानं तेही चुकू शकतात. त्यामुळं त्यांच्यावरही टीका करण्याचा लोकांना जरूर अधिकार आहे. परंतू टीका करताना मर्यादा राखायला हवी. त्यामुळं असे करणाऱ्यांना खंबीरपणे वठणीवर आणावंच लागेल', असं न्यायालयानं म्हटलं आहे.


पश्चात्ताप होतोय

कौटुंबिक जीवनातील कटकटींमुळे आपलं मानसिक संतुलन ढासळले होतं. याच स्थितीमध्ये आपण फेसबुकवर अशी पोस्ट टाकली होती. परंतू, आता त्याचा आपल्याला पश्चात्ताप होत आहे, असं सांगून तिरोडकर यांनी माफी मागितली. मात्र, ही दिलगिरी मनापासून केली नसल्यामुळं न्यायालयाने ती फेटाळून लावली आहे.



हेही वाचा - 

दादर फूल मार्केटमध्ये गोळ्या झाडून एकाची हत्या

गुटखा तस्कर आणि बेकायदा गुटखाविक्री करणाऱ्यांची आता खैर नाही!




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा