बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी केला 18 तास अभ्यास


  •  बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी केला 18 तास अभ्यास
SHARE

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 126 व्या जयंतीनिमित्ताने 14 एप्रिलला विविध ठिकाणी आदरांजली आणि अभिवादन करणारे कार्यक्रम राबवले जातात. असाच एक आगळावेगळा कार्यक्रम या वेळी माटुंगा येथील व्ही. जे. टी.आय या अभियांत्रिकी महाविद्यालयात रविवारी राबवण्यात आला. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी 9 एप्रिल रोजी सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत सलग 18 तास अभ्यास करण्याचा उपक्रम राबवला. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देखील सलग 18 तास अभ्यास करायचे. या जयंती निमित्त त्यांना अभिवादन म्हणून आणि विद्यार्थ्यांना सलग अभ्यास करायची सवय व्हावी, यासाठी हा उपक्रम विद्यार्थ्यांकडून राबवण्यात आला. विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचा गुण अंगिकारता यावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचे  व्ही. जे. टी. आयच्या प्रा. डॉ. वा. भि. निकम म्हणाले.  या विद्यालयातील विविध विभागातील एकूण 256 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या