Advertisement

चिमुरड्यांनी वाचवले पक्ष्यांचे प्राण!


चिमुरड्यांनी वाचवले पक्ष्यांचे प्राण!
SHARES

सध्या मुंबईत वातावरण खूपच तापले आहे. वातावरणात क्षणाक्षणाला बदल देखील होत आहेत. या बदलत्या वातावरणाचा जसा मनुष्यप्राण्यांना त्रास होत अाहे तसाच त्रास पशुपक्ष्यांना देखील होत आहे. उष्णतेमुळे पशूपक्षी मृत्यूमुखीही पडत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यासाठी आता प्लांट अॅनिमल वेल्फेअर सोसायटी आणि काही लहान मुलांनी पुढाकार घेतला आहे. पक्ष्यांना वाचवण्यासाठी त्यांनी जणूकाही मोहीमच सुरू केली आहे.

तापमानामुळे पक्षी पाण्यावाचून तडफडून जमिनीवर पडतात. त्यावेळी त्यांच्यावर कावळे हल्ला देखील करतात. अशाच पक्ष्यांना भांडुप, अंधेरी, मरोळ आणि गोरेगाव परिसरातून प्लांट अँड अॅनिमल वेल्फेअर सोसायटी आणि स्थानिक लहान मुलांनी वाचवले आहे. ज्यात सात घारी आणि दोन पोपटांचा समावेश आहे. या पक्ष्यांना वाचवल्यानंतर त्यांना व्हिटामिन देण्यात आलं आणि त्यानंतर पुन्हा सोडून देण्यात आलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा