किरणकुंज उद्यान नामशेष होण्याच्या मार्गावर


  • किरणकुंज उद्यान नामशेष होण्याच्या मार्गावर
SHARE

मालाड - काही वर्षांपूर्वी मालाड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवरील किरणकुंज उद्यान सुंदर फुलं आणि वेलींनी बहरलेलं दिसायचं. मात्र 2-3 वर्षापासून त्याच्याकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ मिळालेला नाही. एकीकडे रेल्वे प्रशासन स्वच्छ रेल्वे सुंदर रेल्वेचा नारा देतंय आणि स्वच्छतेकडं दुर्लक्ष होत असल्यानं या उद्यानाची मात्र दुरवस्था झालीये. येथे मोठ्या प्रमाणात पालापाचोळा, कचरा साचलाय. सध्या या जागेचा वापर डबेवाले सायकल ठेवण्यासाठी आणि कचराकुंडी ठेवण्यासाठी केला जातोय. याबाबत पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी गजानन महापूतकर यांच्याकडे विचारणा केली असता, काहीही माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या