Advertisement

बिपिन रावत कोण आहेत? जाणून घ्या त्यांच्याबद्दल सर्व काही

लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांना घेऊन जाणारं हॅलिकॉप्टर कोसळलं. या हॅलिकॉप्टरमध्ये १४ जण होते.

बिपिन रावत कोण आहेत? जाणून घ्या त्यांच्याबद्दल सर्व काही
SHARES

लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांना घेऊन जाणारं हॅलिकॉप्टर तामिळनाडूत कोसळलं. या अपघातात बिपिन राऊत जखमी झाल्याचं म्हटलं जातंय. या हॅलिकॉप्टरमध्ये बिपिन राऊत यांच्यासह १४ जण होते.

काहींना रुग्णालयात दाखल केलं आहे. तर काहींचा तपास सुरू आहे. या दुर्घटनेत जखमी झालेले बिपिन राऊत नेमके कोण आहेत? हे जाणून घेऊयात.

लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांची देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बिपिन रावत ३१ डिसेंबर रोजी लष्करप्रमुख म्हणून निवृत्त झाले. यानंतर त्यांची आता सीडीएस (तीन्ही संरक्षण दलाचे प्रमुख)  म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बिपीन रावत १ जानेवारी २०२० पासून पदभार स्वीकारला. ३० डिसेंबर रोजी सरकारनं सीडीएस पदासाठी लष्कराच्या नियमांमध्ये बदल करून वयोमर्यादा ६५ वर्षे केली आहे. त्याची अधिसूचना संरक्षण मंत्रालयाने जारी केली आहे.

२०१६ मध्ये लष्करप्रमुख झाले

सीडीएस बनण्यापूर्वी बिपिन रावत २७वे लष्करप्रमुख होते. लष्करप्रमुख बनण्याआधी, १ सप्टेंबर २०१६ रोजी त्यांची भारतीय लष्कराचे उप-सेनाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

शिमलातल्या शाळेत शिक्षण

जनरल बिपिन रावत हे सेंट एडवर्ड स्कूल, शिमला आणि नॅशनल डिफेन्स अकादमी, खडकसालाचे माजी विद्यार्थी आहेत. डिसेंबर १९७८ मध्ये त्यांना इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडून इथून अकरा गोरखा रायफल्सच्या ५व्या बटालियनमध्ये नियुक्त करण्यात आले. जिथे त्यांना 'स्वार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला. त्यांना दहशतवादविरोधी कारवायांमध्ये काम करण्याचा १० वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे.

विशिष्ट सेवांसाठी सन्मानित

जनरल बिपिन रावत यांना उच्च उंचीवरील लढाऊ क्षेत्रे आणि बंडखोरीविरोधी कारवाया करण्याचा अनुभव आहे. त्यांनी पूर्व सेक्टरमध्ये इन्फंट्री बटालियनचे नेतृत्व केले आहे. काश्मीर खोऱ्यात राष्ट्रीय रायफल्स सेक्टर आणि इन्फंट्री डिव्हिजनचे नेतृत्वही केले आहे.

डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज कोर्सचे माजी विद्यार्थी, जनरल बिपिन रावत यांनी लष्करात ३८ वर्षांहून अधिक काळ देशाची सेवा केली आहे. यावेळी त्यांना शौर्य आणि विशिष्ट सेवांसाठी UISM, AVSM, YSM, SM ने सन्मानित करण्यात आले आहे.

त्यांनी 'राष्ट्रीय सुरक्षा' आणि 'नेतृत्व' या विषयावर अनेक लेख लिहिले आहेत, जे विविध मासिके आणि प्रकाशनांमध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यांनी मद्रास विद्यापीठातून संरक्षण अभ्यासात एम.फिल पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी मॅनेजमेंट आणि कॉम्प्युटर स्टडीजमध्ये डिप्लोमा केला आहे.

जनरल बिपिन रावत यांनी मिलिटरी मीडिया स्ट्रॅटेजिक स्टडीजवर त्यांचे संशोधन पूर्ण केले आहे आणि त्यांना २०११ मध्ये चौधरी चरण सिंग विद्यापीठ, मेरठ येथून डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी (पीएचडी) प्रदान करण्यात आली आहे.हेही वाचा

लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, बड्या लष्करी अधिकाऱ्यांसह बिपीन रावतही जखमी

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा