Advertisement

२६/११ हल्ल्यातील दहशतवाद्यांचा कर्दनकाळ ठरलेले मार्कोस कमांडो

मार्कोस कमांडोमुळे अनेकांचे जीव वाचले. जाणून घेऊयात या मार्कोस कमांडोविषयी महत्त्वपूर्ण गोष्टी...

SHARES
01/5
२६/११ हल्ल्यातील दहशतवाद्यांचा कर्दनकाळ ठरलेले मार्कोस कमांडो
२६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईत पाकिस्तानी दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातला होता. तेव्हा नौसेनेच्या मार्कोस कमांडोनी त्यांना कंठस्नान घातले होते आणि ऑपरेशन पूर्ण केले होते. याच मार्कोस कमांडोमुळे अनेकांचे जीव वाचले. जाणून घेऊयात या मार्कोस कमांडोविषयी महत्त्वपूर्ण गोष्टी...
02/5
२६/११ हल्ल्यातील दहशतवाद्यांचा कर्दनकाळ ठरलेले मार्कोस कमांडो
१) मार्कोस कमांडो फोर्स ही इंडियन नेव्हीची स्पेशल फोर्स युनिट आहे, जी १९८७ मध्ये तयार करण्यात आली होती. २) मार्कोस जगातील सर्वात शक्तिशाली १० फोर्सेसमध्ये येते. ३) मार्कोसला हवा, पाणी आणि जमीन या तिन्ही प्रकारच्या ऑपरेशनसाठी तयार केले जाते.
03/5
२६/११ हल्ल्यातील दहशतवाद्यांचा कर्दनकाळ ठरलेले मार्कोस कमांडो
४) मार्कोस हे ऑल इन वन कमांडो असतात, जे पॅरा जंपिंगपासून सी डायव्हींगपर्यंत सर्वातच पारंगत असतात. ५) मार्कोस फोर्ससाठी निवडण्यात येणारे उमेदवार हे इंडियन नेव्हीतील सर्वात फिट ऑफिसर्स आणि नाविक यांच्यापैकी एक असतात.
04/5
२६/११ हल्ल्यातील दहशतवाद्यांचा कर्दनकाळ ठरलेले मार्कोस कमांडो
६) मार्कोससाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांचे वय २० वर्ष असते. या सर्व उमेदवारांना कडक निवड प्रणाली आणि ट्रेनिंगद्वारे सिलेक्ट करण्यात येते. ७) मार्कोस हे जगातील सर्वोत्कृष्ट शस्त्रे चालवण्यामध्ये तरबेज असतात. त्यांच्या या शस्त्रांच्या युनिटमध्ये इस्त्रायली टव्हर टीएआर २१ रायफल आहे.. त्याला ४० मिमी ग्रॅनेड लाँचर जोडता येते. टीएआर २१ रायफल वेदर सील्ड असल्यानं पाण्याचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही.
05/5
२६/११ हल्ल्यातील दहशतवाद्यांचा कर्दनकाळ ठरलेले मार्कोस कमांडो
८) मार्कोस कमांडोची खरी ओळख गुप्त ठेवण्यात येते. मार्कोसच्या कुटुंबियांना देखील ते मार्कोस कमांडो असल्याचं माहित नसतं. ९) मार्कोस कमांडो पाण्यामध्ये कॉम्बॅट लोडसहीत डुबकी मारण्यात पारंगत असतात. मार्कोस हे त्यांचे दोन्ही हाय पाय बांधलेले असताना देखील पाण्यामध्ये पोहू शकतात.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा