Advertisement

कुर्ला इमारत दुर्घटना: मृतांचा आकडा वाढला, १० जणांचा मृत्यू

कुर्ला पूर्व भागातील नाईक नगर परिसरातील चार मजली इमारत सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली.

कुर्ला इमारत दुर्घटना: मृतांचा आकडा वाढला, १० जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईतील कुर्ल्यातील नाईक नगर भागात काल रात्री चार मजली इमारत कोसळली. कुर्ला पूर्व भागातील नाईक नगर परिसरातील चार मजली इमारत सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली. आता आलेल्या माहितीनुसार, मृतांचा आकडा १० च्या घरात गेला आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या चारही इमारतींना मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस दिली होती. तरीही काही लोक तिथे राहत होते. असे असतानाही त्यात 8 ते 10 कुटुंबे राहत होती. वास्तव्य करणारे रहिवासी भाडेकरू आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी बचाव कार्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबई महापालिकेने नोटीस बजावलेल्या इमारतींमध्ये वास्तव्य करू नये असे आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, मुंबईतील कुर्ल्यातील नाईक नगर भागात काल रात्री चार मजली इमारत कोसळली. त्यावरून राजकारणही सुरू झाले आहे. शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे रात्री उशिरा घटनास्थळी पोहोचले.

तर आता शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनीही या अपघातात नुकसान भरपाई जाहीर केली आहे. एकनाथ शिंदे, आमदार मंगेश कुडाळकर यांनी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व जखमींना भरपाई जाहीर केली आहे.

अपघातातील जखमींच्या कुटुंबीयांना एक लाख, मृतांना 5 लाखांची मदत, एकनाथ शिंदे आणि आमदार मंगेश कुडाळकर यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

सध्या एकनाथ शिंदे तसेच आमदार मंगेश कुडाळकर यांच्यासह अनेक बंडखोर आमदार गुवाहाटीत आहेत.आमदार मंगेश कुडाळकर यांनी ट्विट केले आहे. अपघात.पण शोक व्यक्त करत जखमींच्या नातेवाईकांना एक लाख आणि मृतांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली.

अपघातानंतर कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत पालिकेचे आपत्ती विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.


हेही वाचा

कुर्ला इमारत दुर्घटना : सरकारच्या आधी एकनाथ शिंदेंचा मदतीचा हात, 'इतक्या' भरपाईची घोषणा!

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा