Advertisement

रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळं अतिदक्षता खाटांची कमतरता


रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळं अतिदक्षता खाटांची कमतरता
SHARES

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे गंभीर रुग्णांसाठी असलेल्या अतिदक्षता विभागातील खाटा आणि कृत्रिम श्वसन उपकरणासह असलेल्या खाटांची कमतरता सध्या जाणवत आहे. कृत्रिम श्वसन उपकरणाच्या केवळ ६७ खाटा रिक्त आहेत. त्यामुळे याच पद्धतीने रुग्णसंख्या वाढत राहिल्यास गंभीर रुग्णांवरील उपचारासाठी परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. मुंबईत दररोज २०००च्या आसपास रुग्ण वाढत आहेत. मुंबईतील रुग्णवाढीचा दरही १.२च्या पुढे गेला आहे. 


वेगाने रुग्णसंख्या वाढत आहे. त्यात बहुतांशी रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. मात्र ज्यांना लक्षणे आहेत, त्यापैकी अनेक रुग्ण हे गंभीर अवस्थेत आहेत. दर दिवशी या रुग्णांमध्ये भर पडत असते, तर दररोज ४० ते ५० रुग्णांचा मृत्यू होत असतो. त्यामुळे मोठ्या संख्येने अतिदक्षता विभागातील खाटांचा, ऑक्सिजनसह असलेल्या खाटा आणि कृत्रिम श्वसन उपकरणांसह असलेल्या खाटांची मागणी वाढू लागली आहे.

महापालिकेने खासगी रुग्णालयांच्या मदतीने अतिदक्षता खाटांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. तसेच लक्षणे नसलेल्या रुग्णांनी खासगी रुग्णालयातील खाटा अडवू नयेत, असेही निर्देश देण्यात आले आहेत. पालिकेच्या आकडेवारीनुसार मुंबईत अतिदक्षता विभागाच्या एकूण १७३२ खाटा असून त्यापैकी बुधवारी १४१ खाटा रिक्त होत्या, तर कृत्रिम श्वसन उपकरणाच्या ११०२ खाटा असून त्यापैकी केवळ ६७ खाटा रिक्त होत्या.

खाटा कमी पडू नयेत म्हणून नुकतेच २७ नर्सिग होमनाही कोरोना उपचारांची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ३५० खाटा वाढल्या आहेत. गरजवंतांना त्या खाटा उपलब्ध होऊ शकतील या दृष्टीने या ठिकाणी कोणताही रुग्ण दाखल करताना पालिकेला त्याबाबत कळवावे, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा