भाडेकरूंची माहिती संकेतस्थळावर

  Pali Hill
  भाडेकरूंची माहिती संकेतस्थळावर
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबई महानगर पालिकेच्या 46 हजार 563 भाडेकरूंची संपूर्ण माहिती मालमत्ता खात्यांतर्गत पुढील तीन महिन्यांत पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भाडेकरूंच्या माहितीसह पालिकेनं मक्त्यात दिलेल्या भूखंडांची माहिती, मक्त्याचा कालावधी, मक्ता भूभाडे, मक्तेदाराची माहिती, अतिरिक्त भुईभाडे, मक्त्याच्या अटीशर्ती यांची माहिती या संकेतस्थळावर असणार आहे. मालमत्ता खात्याच्या भाडेवसुलीची, थकबाकीची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध नव्हती. त्यामुळं माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकाराखाली संपूर्ण माहिती मालमत्ता विभागाकडे मागितली होती. त्यानुसार माहिती संकलित करत सर्वसामान्यांसाठी ही माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं मालमत्ता विभागाकडून सांगण्यात आल्याचे गलगली म्हणाले. तर संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध झाल्यास नागरिकांची मोठी सोय होणार असल्याचे म्हणत त्यांनी पालिकेच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.