Advertisement

रायगडातील इर्शाळवाडीवर दरड कोसळली, 10 जणांचा मृत्यू

100 हून अधिक लोक अडकल्याची भीती आहे

रायगडातील इर्शाळवाडीवर दरड कोसळली, 10 जणांचा मृत्यू
SHARES

रायगड परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इरसालवाडीवर काल रात्री उशिरा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. बचावासाठी अग्निशमन दल, एनडीआरएफ घटनास्थळी दाखल होत आहेत.

दरम्यान, घटनास्थळी जात असतानाच एका अग्निशमन दलाच्या जवानाचा दम लागून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

घटनास्थळी पोहोण्यासाठी मुसळधार पाऊस आणि मोठ्या प्रमाणावर असलेलं धुकं बाधा ठरतंय. तसेच पावसामुळे डोंगराचा रस्ता अत्यंत निसरडा झाल्यामुळं बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे.  

अंधार आणि पावसामुळे माती निसरडी झाल्यानं वाडीपर्यंत पोहोचण्यास मदत पथकाला बचावकार्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सध्या 25 जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून 10 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अद्याप 100 जण बेपत्ताच असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल होणार आहेत. 

हा आदिवासी पाडा असून यथे साधारण 250 लोकं राहातात. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिलीय. 100 जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे.

अग्निशमन दलाच्या एका जवानाचा आदिवासी पाड्यापर्यंत पोहोचताना दम लागल्यानं मृत्यू झाल्याचंही समजतंय. मुख्य़मंत्री एकनाथ शिंदे यांनी या संपूर्ण घटनेचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला असून, मुख्यमंत्री दुर्घटनास्थळी जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 



हेही वाचा

नाल्यात वाहून गेलेले चार महिन्याचे बाळ सुखरूप सापडले? फोटोमागील सत्य काय

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा