Advertisement

मुंबईतील पेडर रोडजवळ भूस्खलन, रोडलाही तडे


मुंबईतील पेडर रोडजवळ भूस्खलन, रोडलाही तडे
SHARES

मुंबईत गुरुवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे (Mumbai Rains) शुक्रवारी पेडर रोड येथे एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ भूस्खलन झालं आहे. भूस्खलनामुळे डोंगरावरील झाडे ढिगाऱ्याबरोबर खाली सरकली आहेत.

त्यामुळे फूटपाथलाही तडा गेला. भूस्खलनामुळे स्नेह सदन आणि प्रभू कुंजच्या आजूबाजूचा परिसरही बाधित झाला आहे.

मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पालिकेने स्ट्रक्चरल कन्सल्टंट आणि भूगर्भशास्त्रज्ञ यांना जागेची परिस्थिती पाहण्यासाठी बोलावले आहे, असे एका प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितले.

2011 मध्ये या भागात भूस्खलनाची अशीच घटना घडली होती.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा