नववर्ष स्वागतासाठी वाहतूक नियमन

 BEST depot
नववर्ष स्वागतासाठी वाहतूक नियमन

कुलाबा - नववर्षाच्या स्वागतासाठी वाहतूक विभागदेखील सज्ज झालाय. थर्टी फस्टच्या पार्टीसाठी मुंबईच्या अनेक भागांत मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे वाहतूक विभागाने वाहतुकीचे मार्ग आणि नियोजनात काही बदल केले आहेत. विशेषत: गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह, मरिन लाइन्स अशा भागांत नववर्षानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहतूक मार्गात 31 डिसेंबरला सांयकाळी 7 वाजल्यापासून 1 तारखेच्या पहाटे 6 वाजेपर्यंत बदल करण्यात आले आहेत.

कुलाबा भागातले हे बदल असे आहेत - 

सर्व प्रकारच्या वाहनांना नो एंट्री आणि नो-पार्किंग

पी. जे. रामचंदानी मार्ग

छत्रपती शिवाजी महाराज मार्ग

हाजी निजाम मार्ग ते पी. जे. रामचंदानी मार्ग

हेन्री पथापासून पी. जे. रामचंदानी मार्ग ते बोमन बेहरामपर्यंत

Loading Comments