पश्चिम द्रुतगती मार्गावर कारचा भीषण अपघात, 2 महिलांसह तिघे जखमी

Bandra
पश्चिम द्रुतगती मार्गावर कारचा भीषण अपघात, 2 महिलांसह तिघे जखमी
पश्चिम द्रुतगती मार्गावर कारचा भीषण अपघात, 2 महिलांसह तिघे जखमी
See all
मुंबई  -  

पश्चिम द्रुतगती मार्गावरील वांद्रे येथे सोमवारी मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास लेक्सस गाडीचे टायर फुटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे. उपचारासाठी त्यांना जवळच्याच व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात लेक्सस गाडीचा चक्काचूर झाला.

मिळालेल्या माहितीनुसार ही कार वरळीहून अंधेरीच्या दिशेला जात होती. पण कार जशी वांद्र्याच्या खेरवाडी पुलावर पोहचली तोच टायर फुटल्याने कार सरळ दुभाजकाला जाऊन धडकली. त्या कारमध्ये दोन महिलांसह एकूण चार जण बसले होते. या घटनेत दोन महिलांसह तिघे गंभीर जखमी झाले. सध्या पोलिस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.