Advertisement

पुढचे साडेतेरा वर्षे देशसेवेसाठीच- ले. कर्नल स्वाती महाडिक

प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण मला काही तरी नवीन शिकवत असून दिवसाचे २४ तासही कमी पडू लागले आहेत. यापुढचे माझे सैन्यातील साडे तेरा वर्षे फक्त नि फक्त देशसेवेसाठीच आहेत, अशी प्रतिक्रिया दिली ती लेफ्टनंट कर्नल स्वाती महाडिक यांनी.

पुढचे साडेतेरा वर्षे देशसेवेसाठीच- ले. कर्नल स्वाती महाडिक
SHARES

पतीचं देशसेवेचं व्रत पुढे नेण्यासाठी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला त्या दिवसापासून ते आज सैन्यात रूजू होऊन ६ महिने झाल्यानंतरही मी शिकतच आहे... प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण मला काही तरी नवीन शिकवत असून दिवसाचे २४ तासही कमी पडू लागले आहेत. यापुढचे माझे सैन्यातील साडे तेरा वर्षे फक्त नि फक्त देशसेवेसाठीच आहेत, अशी प्रतिक्रिया दिली ती लेफ्टनंट कर्नल स्वाती महाडिक यांनी.


शहिदांच्या वारसांना घर

मुंबईतील संघवी पार्श्व बिल्डरकडून गुरूवारी एका कार्यक्रमात स्वाती महाडिक यांचा सत्कार अभिनेत्री सुश्मिता सेन हिच्या हस्ते करण्यात आला. संघवी पार्श्व बिल्डरकडून स्वाती महाडिक यांनी संघवी पार्श्वच्या मुंबई-नाशिक महामार्गावरील आटगाव येथील प्रकल्पात मोफत घर देण्यात आलं आहे. याच प्रकल्पात शहिदांच्या वारसांना-कुटुंबियांना सलवतीच्या दरात घरं दिली जाणार असल्याचं संघवी पार्श्व बिल्डरकडून जाहीर करण्यात आलं.



खडतर मेहनतीने लष्करात

साताऱ्यातील कर्नल संतोष महाडिक २०१५ मध्ये लष्करात कर्तव्य बजावताना शहिद झाले. देशासाठी पती शहिद झाल्यानंतर स्वाती महाडिक यांनी धीर खचू न देता जिद्दीनं उभं राहण्याचा निर्णय घेतला. दोन मुलांची जबाबदारी उचलण्याबरोबरच त्यांनी पतीचं देशसेवेचं व्रत पुढं नेण्यासाठी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. सैन्यात जाण्यासाठी वयाचा मोठा अडसर येतं होता. पण लष्कर आणि संरक्षणमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून वयाची अट शिथिल करत स्वाती महाडिक यांना सैन्यात सामावून घेतलं.


प्रेरणादायी प्रवास

अतिशय खडतर आणि कठीण प्रशिक्षण पूर्ण करत ९ सप्टेंबर २०१७ मध्ये त्या लेफ्टनंट कर्नल म्हणून सैन्यात रूजू झाल्या. त्यांची पहिली पोस्टिंग ही पुण्यातील देहूरोड इथं झाली आहे. शिक्षिका, गृहिणी आणि आई ते लेफ्टनंट कर्नल असा स्वाती मडाडिक यांचा हा प्रवास सर्वांच प्रेरणा देणारा आहे. त्यामुळेच स्वाती महाडिक यांचा धडा दहावीच्या नव्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे.

पुढची साडे तेरा वर्षे देशसेवेला दिल्यानंतर, निवृत्त झाल्यानंतरचं आपलं पुढचं आयुष्य हे केवळ आणि केवळ समाजसेवेसाठीचं असणार असल्याचंही महाडिक यांनी यावेळी सांगितलं.



हेही वाचा-

स्वाती महाडिक यांची प्रेरणादायी कहानी आता १० वीच्या पुस्तकात



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा