Advertisement

आयएनएस विक्रमादित्यवर आग; एक अधिकारी शहीद

आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू युद्धनौकेवर आग लागण्याची घटना शुक्रवारी घडली. या दुर्घटनेत एक नौदल अधिकारी शहीद झाले आहेत.

आयएनएस विक्रमादित्यवर आग;  एक अधिकारी शहीद
SHARES

आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू युद्धनौकेवर आग लागण्याची घटना शुक्रवारी घडली. या दुर्घटनेत एक नौदल अधिकारी शहीद झाले आहेत.


कंपार्टमेंटमध्ये आग

आयएनएस विक्रमादित्य ही भारताची विमानवाहू युद्धनौका आहे. ही युद्धनौका कारवार बंदरात प्रवेश करत असताना त्यातील एका कंपार्टमेंटला आग लागली. आग पाहताच नौकेवरील लेफ्टनंट कमांडर डी. एस चौहान यांनी ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. परंतु आग आटोक्यात आणताना ते बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना त्वरित कारवार येथील नौदलाच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

यापूर्वीही आयएनएस विक्रमादित्यवर आग लागण्याची घटना घडली होती. विक्रमादित्य ही नौदलाच्या पश्चिम कमांडची युद्धनौका असून गेल्या तीन वर्षांतली ही आगीची दुसरी घटना आहे. दरम्यान, या आगीवर त्वरित नियंत्रण मिळवण्यात आल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली. तसंच या आगीत युद्धनौकेवरील कोमत्याही लढाऊ साहित्यांचं नुकसान झालं नसल्याचं स्पष्टीकरणही नौदलाकडून देण्यात आलं.


हेही वाचा -

बफरला लोकल धडकल्यानं हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा