Advertisement

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 14 वर्षांनी सिंहाचा जन्म

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सिंह सफारीसाठी गुजरातहून आणलेली ‘मानस’ आणि ‘मानसी’ ही सिंहाची जोडी पर्यटकांचे आकर्षण बनले आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 14 वर्षांनी सिंहाचा जन्म
SHARES

बोरिवलीमधील (borivali) संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सिंह सफारीमध्ये तब्बल 14 वर्षांनी सिंहाच्या (lion) छाव्याचा (cub) जन्म झाला आहे. सिंह सफारीमधील ‘मानसी’ नावाच्या मादी सिंहाने गुरुवारी रात्री एका छाव्याला जन्म दिला.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (sanjay gandhi national park) सिंह सफारीसाठी गुजरातहून (gujrat) आणलेली ‘मानस’ आणि ‘मानसी’ ही सिंहाची जोडी पर्यटकांचे आकर्षण बनले आहे.

सिंहाची ही जोडी 2022 मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल झाली होती. मात्र, या जोडीमध्ये ताणतणाव असल्यामुळे त्यांच्यात मिलन होत नव्हते.

मध्यंतरी मानसी आजारी होती. दरम्यान, मागील वर्षी उद्यानातील पथकाने मानसी आणि मानस यांच्या मिलनासाठी प्रयत्न सुरू केले होते. नोव्हेंबर 2024 मध्ये तपासणी केल्यानंतर मानसी गरोदर असल्याचे समजले.

गुरुवारी 16 जानेवारी रोजी रात्री मानसीने एका छाव्याला जन्म दिला. छावा आणि मानसी दोघे सुखरूप असून सध्या दोघेही वन कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली आहेत.

दरम्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 2009 मध्ये रवींद्र आणि शोभा ही सिंहाची जोडी आणण्यात आली होती. गोपा आणि जेस्पा हे या जोडीचे छावे आहेत. सिंहाचे हे चौकोनी कुटुंब गेली अनेक वर्षे पर्यटकांसाठी आकर्षण ठरले होते.

काही वर्षांपूर्वी शोभाचा मृत्यू झाला. त्यानंतर 2021 मध्ये गोपा आणि रवींद्र, तसेच जेप्सा यांचा 2022 मध्ये मृत्यू झाला. याचदरम्यान 2022 मध्ये गुजरातमधून ‘मानस’ आणि ‘मानसी’ या जोडीला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले होते.



हेही वाचा

लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत

कोल्डप्ले कार्यक्रमात लहान मुलांना प्रवेशबंदी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा