Advertisement

आतापर्यंत 9 लाख कामगारांना त्यांच्या मूळ गावी सुखरूप पाठवले - गृहमंञी अनिल देशमुख

कामगारांसाठी ६९६ विशेष श्रमिक ट्रेन महाराष्ट्रातील विविध भागातून सोडण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

आतापर्यंत 9 लाख कामगारांना त्यांच्या मूळ गावी सुखरूप पाठवले - गृहमंञी अनिल देशमुख
SHARES
महाराष्ट्रात विशेष करुन मुंबई मध्ये परराज्यातून आलेल्या कामगारांना त्यांच्या स्वगृही परत जाण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. २७ मे पर्यंत जवळपास ९ लाख ८२  हजार परप्रांतीय कामगारांना स्वगृही परत पाठविण्यात आले.  यासाठी ६९६ विशेष श्रमिक ट्रेन  महाराष्ट्रातील विविध भागातून सोडण्यात आल्याची माहिती  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

विविध राज्यात गेलेल्या विशेष श्रमिक ट्रेन

आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये ३७४ बिहारमध्ये १६९, मध्यप्रदेशमध्ये ३३, झारखंडमध्ये ३०, कर्नाटक मध्ये ६, ओरिसामध्ये १३, राजस्थान १५, पश्चिम बंगाल ३३, छत्तीसगडमध्ये ६ यासह इतर राज्यांमध्ये एकूण ६९६ ट्रेन या सोडण्यात आलेले आहेत.
राज्यातील सर्वच रेल्वे स्टेशन मधून या ट्रेन सोडण्यात येत असून यात प्रमुख्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (सीएसएमटी) मधून १११, लोकमान्य टिळक टर्मिनल ११२, पनवेल ४२, भिवंडी १०, बोरीवली ५२, कल्याण ८, ठाणे २८, बांद्रा टर्मिनल ५८, पुणे ६९, कोल्हापूर २३, सातारा १३, औरंगाबाद १२, नागपुर १४  यासह राज्यातील इतर रेल्वे स्टेशन वरून  विशेष श्रमिक ट्रेन सोडण्यात आल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले. 

मुंबईत मोठ्याप्रमाणात परप्रातीय राहत आहेत. त्यांना परप्रांतात पाठवण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपवण्यात आली होती. 2 मेपासून या नोंदणी प्रक्रियाला सुरूवात झाली. त्यानंतर 4 मेला पहिला बस मुंबईतन राजस्थानला रवाना झाली होती. प्रतिक्षा यादी व वैद्यकीय प्रमाणपत्र यामुळे प्रक्रियेला पाहिजे तशी गती मिळत नव्हती. त्यामुळे अनेक परप्रांतीय मजूरांनी पायीच गाव गाठण्याचा निर्णय घेतला. अशातच औरंगाबाद येथे झालेल्या रेल्वे अपघातात 16 मजुरांचा मृत्यू झाला होता.

 पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेता प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली आहे. सहपोलिस आयुक्त विनय चौबे व उपसचिव राहुल कुलकर्णी यांचाही समावेश करण्यात आला असून त्यांच्या मदतीसाठी 1421 मंत्रायीन कर्मचारी देण्यात आले आहेत. त्याबाबतचा निर्णय  राज्य सरकारने जारी केला आहे. पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी हे नियोजन करण्यात आले असून  40 वर्षांखालील कर्मचा-यांना या समितीत समाविष्ठ करण्यात आले आहे. ही समिती परराज्यात जाणा-या व्यक्तींचे नियोजन करणार आहे. त्यासाठी स्थानिक पोलिसांच्या मदतीने काम करण्यात येणार असून परराज्यात मजुरांना पाठवण्यासाठी नॅशनल मायग्रन्टस् इन्फोर्मेशन सिस्टीम(एनएमआयएस) या डिजिटल यंत्रणेचा वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या अभिनेता सोनू सूदही परप्रांतीय मजुरांच्या मदतीसाठी सरसावला असून त्याच्या मार्फतही अनेक मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा