वाहतूककोंडीला लागला ब्रेक

 Lokhandwala
वाहतूककोंडीला लागला ब्रेक
वाहतूककोंडीला लागला ब्रेक
वाहतूककोंडीला लागला ब्रेक
See all

लोखंडवाला - कांदिवली स्टेशन पूर्व ते लोखंडवाला या मार्गावरील वाहतूककोंडीला आळा बसला आहे. हे अंतर आता अवघ्या 10 ते 12 मिनिटात पार करता येऊ लागलंय. ही कोंडी सोडवण्यासाठी कांदिवलीचे आमदार अतुल भातखळकर आणि लोखंडवाला रेसिडेंंट्स असोसिएशननं पुढाकार घेतला.

यापूर्वी कांदिवली स्टेशनपासून मालाड, गोरेगावला जाण्यासाठी हाय-वेखाली एकच वळण (राइट टर्न) होतं. त्यामुळं मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत होती. तसंच प्रवाशांना अर्धा तास ताटकळत उभं रहावं लागायचं. ते वळण आता बंद करण्यात आलंय. त्यामुळं मालाड, गोरेगावला जाण्यासाठी बोरिवलीच्या दिशेनं गाड्या वळवून ठाकूर कॉम्पलेक्स फ्लायओव्हर खालील यु टर्नने मालाड, गोरेगावला जाण्यासाठी मार्ग तयार करण्यात आलाय. त्यामुळं आकुर्ली रोडवर होणाऱ्या वाहतूक कोंडीला आळा बसलाय आणि या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठाच दिलासा मिळाला आहे.

वाहतूक व्यवस्थेतल्या या बदलाची माहिती देणारे फलक हाती घेऊन लोखंडवालातले रहिवासी रस्त्यावर उभे राहतायत. 15-20 दिवसांपासून त्यांनी हा उपक्रम राबवल्याबद्दल आ. भातखळकर यांनी या रहिवाशांचं कौतुक करून आभारही मानले आहेत.

Loading Comments