26 वर्षांनी मिळाली चेन !

मुंबई - मुंबईच्या माजी महापौर आणि नगरसेविका शुभा राऊळ यांची चोरीला गेलेली चेन सापडली ती चक्क 26 वर्षानंतर...एखाद्या चित्रपटातील कथानकाला साजेशी अशीच ही घटना..पण ही चेन मिळायला त्यांना 26 वर्ष का लागली याचं उत्तर या घटनेइतकंच आश्चर्यकारक आहे.

निव्वळ पत्ता बदलल्यामुळे ही चेन मिळण्यासाठी शुभा राऊळ यांना 26 वर्ष लागली...तेव्हा जरी त्यांनी बदललेला पत्ता कळवला नसला, तरी आता मात्र त्यांनी चूक मान्य केलीये. या चेनच्या पैशातून मुलीच्या शिक्षणाचा खर्च करणार असल्याचं शुभा राऊळ म्हणतायत खरं. पण पत्ता बदलल्याचं सरकार दरबारी न कळवल्यामुळे काय होऊ शकतं, याचं आदर्श उदाहरण स्वत: मुंबईच्या माजी महापौरांनीच दिलंय हे नक्की.

 

Loading Comments