Advertisement

मेट्रो ३ च्या निविदांना चांगला प्रतिसाद


मेट्रो ३ च्या निविदांना चांगला प्रतिसाद
SHARES

मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) मुंबई मेट्रो ३ च्या डेपो यांत्रिकीकरण आणि विद्युतीकरण प्रणालीसाठी निविदा मागवल्या होत्या. याला निविदाकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत निविदा मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनकडं पाठवल्या आहेत.


या कामांचा समावेश

मुंबई मेट्रो ३ च्या डेपोचे यांत्रिकीकरण आणि विद्युतीकरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये डिझाईन, सप्लाय, स्थापना, चाचणी आणि प्रत्यक्ष प्रकल्पाची सुरवात करणे अशा कामांचा समावेश आहे. तसेच मेक इन इंडिया अंतर्गत या प्रणालीमध्ये स्थानिक उद्योजकांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचंही एमएमआरसीकडून सांगण्यात आलं आहे.


निविदाकर्त्यांची नावे

१) मे. व्होल्टास लि.

२) मे. ब्लूस्टार लि.

२) मे. इटीए आणि मे.पोलीकॅब संयुक्तिक

४) मे.जॅकसन लि.

५) मे.स्टर्लिंग आणि विल्सन प्रा.लि

६) मे.सॅम इंडिया बिल्टवेल प्रा.लि.


निविदांना अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला अाहे. डेपोचे दैनंदिन कामकाज आणि देखभाल ही अत्याधुनिक व उत्कृष्ट विद्युतीकरण यांत्रिकीकरण प्रणालीच्या सहाय्याने करण्यात येणार आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

 - अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालक, एम.एम.आर.सी.



हेही वाचा -

लालबाग उड्डाणपुलावर ट्रक उलटला, वाहतूक ठप्प

बघा, 'अशी' आहे अकरावीची पहिली 'मेरीट लिस्ट'



 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा