स्टँप पेपरवर प्रेमाची गॅरंटी

  Mumbai
  स्टँप पेपरवर प्रेमाची गॅरंटी
  मुंबई  -  

  सोशल मीडियावर अनेकदा कोणते न कोणते पोस्ट व्हायरल होतच असतात. मध्यंतरीच सोनम गुप्ता बेवफा है ची ट्रेंड सुरू होती. पण आता राम आणि पुजा यांची प्रेम कहाणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.

  एका 100 रुपयाच्या स्टँप पेपरवर प्रियकर रामने त्याच्या प्रेयसीला प्रेमाची हमी देणारे पत्र लिहिले आहे. 'मी फक्त तुझ्याशीच प्रेम करतो, मरेपर्यंत साथ सोडणार नाही आणि लग्न करेन तर, फक्त तुझ्याशीच असे त्याने या स्टँप पेपरवर लिहिले आहे. इतकेच नव्हे तर 'माझे शब्दच माझे वचन आहे', असेही त्याने पुढे लिहले आहे. या 100 रुपयाच्या स्टँप पेपरवरील तारीख 5 मे 2016 आणि 2017 अशी आहे. पण अजूनपर्यंत राम आणि पुजाच्या प्रेमकथेला कुणीही समजू शकलेले नाही. या पुजाचा राम आहे तरी कुठे याबाबत कुणालाच काही माहीत नाही.

  पण या पोस्टच्या नंतर आता प्रेमाची हमी देणारे स्टँप पेपर असू शकते का? असाच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.