Advertisement

मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा; ३ महिने पुरेल इतकाच पाणीसाठा जमा


मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा; ३ महिने पुरेल इतकाच पाणीसाठा जमा
SHARES

मागील काही दिवसांपासून मुंबईत मुसळाधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळं तलाव क्षेत्रात दिलासादायक पाऊस न झाल्याचं समजतं. दरवरषी तलाव क्षेत्रात योग्य पाऊस झाल्यास मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटते. परंतु, यंदा तलाव क्षेत्रातील पाणीसाठ्यात २०१८ आणि २०१९ या दोन वर्षांच्या तुलनेत सर्वात कमी जलसाठा आहे. त्यामुळं मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याची गरज आहे.

जून महिन्यात पावसानं चांगली हजेरी लावली नाही. परंतु, जुलै महिन्यात पावसानं तुफान हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. परंतु, तलाव क्षेत्रात सुमारे ३ लाख ६१ हजार जलसाठा जमा झाला आहे. गतवर्षी तलाव क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यानं यंदाचा उन्हाळ्यात मुंबईकरांना पाण्याची चिंती भासली नाही. तलावांमध्ये जुलै महिन्यापर्यंत पुरेल एवढा जलसाठा असल्यानं मुंबईकर निश्चिंत होते.

मुंबईत मान्सून दाखल झाल्यानंतरही जून महिना कोरडा गेला, तर जुलै महिन्यातही पावसानं अद्याप तलाव क्षेत्रामध्ये अपेक्षित जोर धरलेला नाही. अधूनमधून बरसणाऱ्या सरींमुळं तलाव क्षेत्रात आता ३ महिने पुरेल इतका जलसाठा जमा झाला आहे. परंतु, गेल्या २ वर्षांतील हा सर्वात कमी जलसाठा असल्यानं चिंता व्यक्त होत आहे.

मुंबईत दररोज ३ हजार ८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. १ ऑक्टोबर रोजी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असल्यास वर्षभराचा पाणीप्रश्न मिटतो. मुंबईला ७ तलावांतून पाणी पुरवठा केला जातो.



हेही वाचा -

मुसळधार पावसाने मुंबईचे केले ‘इतके’ नुकसान

बारावीच्या निकालात मुलींची बाजी, राज्याचा निकाल ९०.६६ टक्के



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा