Advertisement

लोअर परळ पूल ४ दिवसांनी खुला


लोअर परळ पूल ४ दिवसांनी खुला
SHARES

लोअर परळ येथील डिलाइल या पादचारी पुलाची एक बाजू शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास खुला करण्यात आला. शुक्रवारी पहाटे सहा वाजता या पादचारी पुलाची एक बाजू खुली होणार असल्याचं पश्चिम रेल्वेने जाहीर केलं होतं. मात्र या पुलाची दुरुस्ती आणि इतर कामासाठी हा पूल सुरू करण्यास विलंब लागला. पादचाऱ्यांसाठी हा पूल अखेर खुला करण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.


म्हणून पूल सुरू करण्यात विलंब

दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी डिलाइल पूल मंगळवारपासून पादचारी आणि वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे लोअर परळ स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली होती. यावेळी नागरिकांकडून पश्चिम रेल्वे प्रशासनावर संतप्त प्रतिक्रिया उमटली. त्यानंतर पुलाची पाहणी करून एक बाजू खुली करण्यास मान्यता देत गुरुवारी संध्याकाळपासूनच दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं. त्यानुसार शुक्रवारी सकाळीच हा पूल सरू करण्याचं जाहीर करण्यात आलं. मात्र प्रत्यक्ष पादचारी पूल सुरू करण्यास जास्त कालावधी लागला.


पालिकेनं परवानगी नाकारली

पश्चिम रेल्वेने पुलाची ही बाजू सुरू करण्यास कोणतीही अडचण नसल्याचं म्हणत शुक्रवारी पुलाची एक बाजू सुरू करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. मात्र पालिकेनं परवानगी नाकारली. कारण तिथे सिमेंटचे थर सुकण्याची प्रतीक्षा शिल्लक होती. ती संपल्यानंतर शुक्रवारी रात्री दहा वाजता इथून पादचाऱ्यांना जाण्यास परवानगी देण्यात आली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा