Advertisement

महानंद, चितळे, गोवर्धन, कात्रज दुधाच्या दरात 'इतकी' वाढ

आता राज्यात दूधाच्या दरातही वाढ करण्यात आली आहे.

महानंद, चितळे, गोवर्धन, कात्रज दुधाच्या दरात 'इतकी' वाढ
SHARES

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत (Mumbai) पेट्रोल-डिझेलचे दर सर्वाधिक आहेत. या इंधन दरवाढीचा परिणाम जीवनावश्यक वस्तुंवरही होणार आहे. आता राज्यात दूधाच्या (Milk) दरातही वाढ करण्यात आली आहे. १५ मार्चपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत.

राज्यभर गाईच्या दूध खरेदी आणि विक्री दरात प्रतिलिटर प्रत्येकी तीन आणि दोन रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय राज्यातील सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संघांकडून घेण्यात आला आहे.

सध्या राज्यात महानंद, चितळे, गोवर्धन, कात्रज दुधाच्या खरेदीत तीन रुपये तर विक्री दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

राज्यभर गाईच्या दूध खरेदी आणि विक्री दरात प्रतिलिटर प्रत्येकी तीन आणि दोन रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय राज्यातील सहकारी व खासगी दूध उत्पादक संघांकडून घेण्यात आला आहे.

ग्राहकांना प्रति लिटर दूधामागे आता दोन रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून जे दूध संघ दूध खरेदी करतात त्या शेतकऱ्यांना तीन रुपये प्रतिलिटर वाढवून देण्यात येणार असल्याचा निर्णय एका बैठकीत घेण्यात आला आहे.

या नव्या निर्णयामुळे, आता गाईच्या दुधाचा खरेदीदर प्रतिलिटर ३३ रुपये तर, पिशवीबंद दुधाचा किरकोळ विक्री दर प्रतिलिटर ५२ रुपये असणार आहे. या दूध दरवाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी १५ मार्चपासून करण्यात आली आहे.

दूध पावडर आणि लोणी यांचे वाढलेले दर आणि त्यामुळे दूधाची वाढती मागणी. तसंच, कमी उत्पादनामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे वाहतूक खर्च, वीज, पॅकेजिंग, लॉजिस्टिक आणि चारा यांच्या वाढत्या किंमतीमुळे दरवाढ करण्यात आली.हेही वाचा

अमूल नंतर 'या' ब्रँडनंही दूधाची किंमत वाढवली, 'हे' आहेत नवे दर

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा