Advertisement

अमूल नंतर 'या' ब्रँडनंही दूधाची किंमत वाढवली, 'हे' आहेत नवे दर

सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक फटका बसणार आहे.

अमूल नंतर 'या' ब्रँडनंही दूधाची किंमत वाढवली, 'हे' आहेत नवे दर
SHARES

सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक फटका बसणार आहे. अमूलनंतर (Amul Milk) आता पराग दूध (Parag Milk Price Hike) महागलं आहे. डेअरी फर्म पराग मिल्क फूड्स लिमिटेडनं (Parag Milk Foods Ltd) मंगळवारपासून लागू झालेल्या गोवर्धन ब्रँडच्या गायीच्या दुधाच्या दरात लिटरमागे २ रुपयांनी वाढ केली आहे.

गोवर्धन गोल्ड मिल्कचा (Gowardhan Gold Milk) दर आता ४८ रुपयांवरून ५० रुपये झाला आहे. टोन्ड व्हरायटीसह गोवर्धन फ्रेशचा (Gowardhan fresh) भाव ४६ रुपयांवरून ४८ रुपयांवर पोहोचला आहे.

पराग मिल्क फूड्स लिमिटेडनं मंगळवारी सांगितलं की, वाढत्या किमतीमुळे दरात ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. नवे दर मंगळवार, १ मार्चपासून लागू झाले आहेत.

पराग मिल्क फूड्सचे अध्यक्ष देवेंद्र शहा म्हणाले की, वीज, पॅकेजिंग, लॉजिस्टिक आणि पशुखाद्य यांच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्यामुळे कंपनीनं तीन वर्षांनंतर किमती वाढवल्या आहेत.

दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचा खर्चही वाढला असून त्यांना आता दुधासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळेच कंपनीला त्याची किंमत लक्षात घेऊन किमती वाढवाव्या लागल्या.

गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशननं (GCMMF) मंगळवार, १ मार्चपासून देशभरातील अमूल ब्रँडच्या दुधाच्या किमतीत वाढ केली आहे. कंपनीने सर्व प्रकारांवर लिटरमागे दोन रुपयांनी वाढ केली आहे.

अमूलचे गोल्ड मिल्क आता ५८ ऐवजी ६० रुपये लिटर झाले आहे. तसंच अमूल टोन्ड ४६ ऐवजी ४८ रुपये प्रति लिटर आणि अमूल शक्ती ५२ ऐवजी ५४ रुपये प्रति लिटर झाला आहे.

जीसीएमएमएफचे म्हणणं आहे की, प्रति लिटर २ रुपयांनी किंमत वाढवल्यानंतर एकूण किरकोळ किंमत ४ टक्क्यांनी वाढेल, जी अन्न महागाई दरापेक्षा कमी आहे.

कंपनीनं दावा केला आहे की, पॉलिसी अंतर्गत, दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थांपासून ८० टक्के कमाई शेतकऱ्यांना दिली जाते. भाव वाढल्यानं महागाईनं होरपळलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल.



हेही वाचा

अमूल दूध महागलं, मंगळवारपासून लागू होणार ‘हे’ नवे दर

बेस्ट युनियनतर्फे २ मार्चला महाआंदोलन, प्रवाशांचे हाल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा