Advertisement

समृद्धी महामार्गावर अपघातात 12 ठार तर 23 जखमी, चौकशीचे आदेश

अपघाताबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटही केलं आहे.

समृद्धी महामार्गावर अपघातात 12 ठार तर 23 जखमी, चौकशीचे आदेश
SHARES

मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 12 लोक मृत्युमुखी पडले तर 23 जण गंभीर जखमी झाले आहेत. आज (15 ऑक्टोबरला) पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला.

टेम्पो ट्रॅव्हल (MH20 GP 2212) आणि ट्रक (MP09 MH 6483) यांची टक्कर होऊन हा अपघात झाला. ही वाहने छत्रपती संभाजीनगर येथून शिर्डीच्या दिशेने जात होते. समोरील ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. टेम्पो ट्रॅव्हलमधील प्रवासी बुलढाणा येथील सैलानी बाबा यांचं दर्शन घेऊन शिर्डीला जात होते.

सर्व जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींची प्रकृती स्थिर असून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस चालकाचे चाकांवरचे नियंत्रण सुटले आणि बस जांबरगाव टोल प्लाझाजवळ मागील बाजूने थांबलेल्या कंटेनर ट्रकला धडकली. 17 जणांना वाहून नेण्याची क्षमता असलेली ही मिनी बस ओव्हरलोड होती, मात्र त्यात जवळपास 35 प्रवासी प्रवास करत होते, असे वैजापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्यामसुंदर कवठाळे यांनी सांगितले.

अपघाताबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटही केलं आहे. त्यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. समृद्धी महामार्गावर जो अपघात झालेला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे. मृतांना पाच लाख आणि जखमींना मोफत उपचार आम्ही जाहीर केलेला आहे.

एका ट्रकला येऊन मागून एक पॅसेंजर गाडी धडकलेली आहे. नेमका हा अपघात का झाला याची चौकशी करण्यासाठी आम्ही एक समिती बनवतोय आणि त्याला चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा