Advertisement

महाराष्ट्र बंदमुळे बेस्ट बसवर काय होणार परिणाम? जाणून घ्या...

महाराष्ट्र बंदचा बेस्ट बसवर काय परिणाम होईल हे जाणून घ्या...

महाराष्ट्र बंदमुळे बेस्ट बसवर काय होणार परिणाम? जाणून घ्या...
SHARES

महाराष्ट्र बंदमध्ये (Maharashtra bandh) मुंबईतील बेस्ट बस (best bus) आणि एसटी बसचा (st bus) समावेश असणार आहे. शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेनेनं महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बेस्ट (Mumbai best bus update) आणि एसटी सेवा बंद आहे.

बंदमुळे (maharashtra bandh live update) शाळा आणि महाविद्यालय बंद असणार आहे. तर दुसरीकडे मुंबईची बेस्ट वाहतूक सेवाही विस्कळीत  राहणार आहे. त्याच पाठोपाठ गावागावात पोहोचलेली एसटी बस सेवा सुद्धा बंद राहण्याची शक्यता आहे. शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेनेनं याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बेस्टची सेवा बंद आहे. 

तर दुसरीकडे, बंदमध्ये बेस्ट वर्कर्स युनियन सहभागी होणार नाही. बेस्ट ही अत्यावश्यक सेवा आहे. अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असा शासनाचा निर्णय असताना बेस्ट बंदमध्ये सहभागी होऊ शकत नाही. बेस्ट कामगार सेना कर्मचाऱ्यांना बंदचे आवाहन करून राज्य सरकारच्या निर्णयाचं उल्लंघन करत आहे, असा आरोप कामगार नेते शशांक राव यांनी केला आहे.

अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्याचा अधिकार बेस्ट कामगार सेनेला कुणी दिला. कामगारांच्या अधिकारासाठी बंद पुकारला तर कारवाई होते. मग आता बंद केला तर कारवाई होणार नाही, याची खात्री सुहास सामंत देणार का? असा सवालही राव यांनी विचारला.

यासोबतच मनसेनी देखील बंदला विरोध केला आहे. मनसेच्या महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार म्हणाले की, लखीमपूर खेरी इथं घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. आम्हीही त्याचा निषेध करतो. परंतु, महाराष्ट्रात सरकार मधीलच पक्षांनीच महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यामागे नेमकं कोणतं लॉजिक आहे कळत नाही. आधीच कोरोनामुळे गेले दीड दोन वर्ष व्यापारी आर्थिक संकटात आहे. आता कुठे काही प्रमाणात सर्व सुरळीत होतंय. त्यात असे बंद व्यापाऱ्यांना परवडणारे नाहीत आणि निषेध करायचंय तर अन्य मार्ग आहेत त्याचा अवलंब करावा बंदच का? सरकारच बंद करणार असेल तर गाऱ्हाणं मांडायच तरी कोणाकडे ? या बंदमध्ये सामिल न होता व्यापाऱ्यांनी काळ्या फिती लावून आपली दुकाने चालू ठेवावी.

लखीमपूरच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारच्या तिन्ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं महाराष्ट्र बंदची उद्या हाक दिली आहे.



हेही वाचा

महाराष्ट्र बंद! जाणून घ्या काय सुरू, काय बंद?

महाराष्ट्र बंदमध्ये ‘ही’ व्यापारी संघटना नाही होणार सहभागी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा