Advertisement

नवी मुंबई विमानतळाची मालकी अदानी समूहाकडं

या विमानतळाच्या बांधकामासाठी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. यांची सवलतधारक म्हणून निवड करण्यात आली आहे. या कंपनीच्या मालकी हक्कामध्ये बदल झाला आहे.

नवी मुंबई विमानतळाची मालकी अदानी समूहाकडं
File Image
SHARES

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची (Navi Mumbai International Airport) मालकी आता अदानी समूहाकडं (Adani Group) गेली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विमानतळाच्या बांधकामातील सवलतधारक कंपनीच्या मालकी हक्कात बदल करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.  त्यानुसार  नवी मुंबई विमानतळाचे विकासकाचे मालकी हक्क जीव्हीके समुहाकडून (GVK Group) अदानी समुहाकडे देण्यात आले आहेत.

या विमानतळाच्या बांधकामासाठी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. यांची सवलतधारक म्हणून निवड करण्यात आली आहे. या कंपनीच्या मालकी हक्कामध्ये  बदल झाला आहे. यापूर्वी या कंपनीमध्ये ५०.५ टक्के समभाग असणाऱ्या जीव्हीके एअरपोर्ट डेव्हलपर लि. या कंपनीचे समभाग अदानी एअरपोर्ट होल्डिंग लि. यांनी घेतले आहेत. 

या बदलास केंद्र सरकारच्या नागरी विमान संचालनालय, विमानतळ प्राधिकरण, सेबी, कॉम्पिटीशन कमिशन ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे. तसंच सिडको संचालक मंडळानेही मालकी हक्काच्या बदलास मान्यता देण्याचा ठराव केला आहे. या पार्श्वभूमीवर या मालकी हक्कात बदल करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

नवी मुंबई येथे १ हजार १६० हेक्टर क्षेत्रावर सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर ग्रीन फिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्यात येत आहे. त्यासाठी जमिनीचे भुसंपादन पूर्ण झाले असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची भूविकास कामे पूर्ण झाली आहेत. या विमानतळाचा पहिला टप्पा २०२३-२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी सिडको नोडल एजन्सी म्हणून काम करत आहेत.

या विमानतळात एकमेकांशी जोडलेले ३ टर्मिनल असतील. याच्या केंद्रस्थानी सेंट्रल टर्मिनल कॉम्प्लेक्स असणार आहे. हे विमानतळ दरवर्षी जवळपास ९ कोटी प्रवाशांना सेवा देऊ शकेल असंही सांगण्यात आलंय. या विमानतळाला पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही दिशांनी प्रवेशद्वार असणार आहे. हे विमानतळ एकूण ४ टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे. विमानतळावर दोन समांतर धावपट्ट्या बांधण्यात येणार आहे. त्यामुळे विमानांची लँडिंग आणि टेकऑफ एकाचवेळी करता येऊन विमानांची अधिक सोय होईल आहे.



हेही वाचा -

महापालिकेचं पहिलं २१ मजली स्वयंचलित वाहनतळ सुरू

तलावांमध्ये आता केवळ १५ टक्के जलसाठा शिल्लक

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा