Advertisement

गुड न्यूज! सलग आठव्या दिवशी कोरोना मुक्त रुग्णांच्या संख्येत वाढ

राज्याचा Recovery Rate हा आता ९३.५२ टक्क्यांवर गेला आहे.

गुड न्यूज! सलग आठव्या दिवशी कोरोना मुक्त रुग्णांच्या संख्येत वाढ
SHARES

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सलग ८ दिवसांपासून ही संख्या वाढलेली आहे. बुधवारी (९ डिसेंबर) ५ हजार १११ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या ही १७ लाख ४२ हजार १९१ एवढी झालीय. तर ४ हजार ९८१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्याही १८ लाख ६४ हजार ३४८ एवढी झाली आहे. दिवसभरात ७५ जणांचा मृत्यू झालाय. रुग्ण संख्या कमी झालेली असताना मृत्यूचा आलेख निच्चांकी पातळीवर आणण्याचं आव्हान अजुनही कायम आहे. त्यासाठी काय करता येईल यावर आता आरोग्य विभागाने लक्ष केंद्रीत केलं आहे.

हेही वाचाः- गुड न्यूज! आता सर्व शासकीय रुग्णालयात मिळणार मोफत रक्त

राज्याचा Recovery Rate हा आता ९३.५२ टक्क्यांवर गेला आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या ही आता १७ लाख ४७ हजारांच्या जवळ गेली आहे. तर दिवसभरात ४ हजार ९८१ नवे रुग्ण आढळून आलेत. राज्यात आत्तापर्यंत १ कोटी १५ लाखांपेक्षा जास्त कोविड चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यात कोविड बाधितांचं प्रमाण हे १६.२४ टक्के एवढं आहे. मुंबईत (Mumbai) गेल्या काही दिवसांच्या तुलनेत कोरोनाची (Coronavirus) रुग्णसंख्या कमी झाली आहे. मात्र असे असले तरीही कोरोनाचा धोका अद्याप कमी झालेला नाही. दरम्यान मुंबईचे आयुक्त इकबाल सिंह चहल (Ikbal singh chahal) यांनी इशारा दिला आहे. ते म्हणाले की कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास मुंबईत नाईट कर्फ्यू (Mumbai Night curfew) लावण्यात येईल.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा