Advertisement

एमसीएनं थकविला राज्य सरकारचा १२० कोटींचा महसूल

मुंबई क्रिकेट असोसिएशननं (एमसीए) राज्य सरकारचा १२० कोटी १६ लाख १७ हजार रुपयांचा कर थकविला आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी एमसीएला शासनानं नोटीस बजावली आहे.

एमसीएनं थकविला राज्य सरकारचा १२० कोटींचा महसूल
SHARES

मुंबई क्रिकेट असोसिएशननं (एमसीए) राज्य सरकारचा १२० कोटी १६ लाख १७ हजार रुपयांचा कर थकविला आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी एमसीएला शासनानं नोटीस बजावली असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.

५० वर्षांचा भाडे करार

मुंबईतील वानखेडे स्टेडिअमसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला राज्य सरकारनं ५० वर्षांच्या भाडे करारानं दिलेल्या जागेची मुदत मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात संपली होती. त्यामुळं करार नूतनीकरण, थकित कर व अनधिकृत बांधकामाबाबत मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयानं नोटीस बजावली आहे. मात्र, मुंबई क्रिकेट असोसिएशनला थकित कर भरण्यासाठी मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयानं दिलेल्या नोटिशीबाबत काँग्रेस आमदार अस्लम शेख, अमिन पटेल, शिवसेनेच्या अजय चौधरी आदींनी प्रश्न उपस्थित केला होता.

भाडेपट्टा भरणं आवश्यक

यावर राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं मुंबई क्रिकेट असोसिएशनला ५० वर्षांसाठी भाडेपट्ट्यानं जमीन दिली होती. मात्र, ५ फेब्रुवारी २०१८ रोजी भाडेपट्टा करार संपुष्टात आला. भाडेपट्टीच्या नूतनीकरणासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला पत्र पाठवलं असून, एमसीएनं १२० कोटी १६ लाख १७ हजार ८५ रुपये भाडेपट्टा नूतनीकरणासाठी भरणं आवश्यक असल्याचं नोटिशीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणी मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी सुरू असल्याचं देखील उत्तरात नमूद केलं आहे.हेही वाचा -

मंत्रालयात दूषित पाण्यानं १००हून अधिक कर्मचाऱ्यांना उलट्या व जुलाबRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा