Advertisement

मराठी भाषा विभागातर्फे नवलेखकांसाठी कार्यशाळेचं आयोजन

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्यावतीने नवलेखकांसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे.

मराठी भाषा विभागातर्फे नवलेखकांसाठी कार्यशाळेचं आयोजन
SHARES

महाराष्ट्र शासनाच्या (maharashtra government) मराठी भाषा विभागाच्यावतीने नवलेखकांसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. आठवडाभर चालणाऱ्या या कार्यशाळेतून नवलेखकांना ज्येष्ठ साहित्यिकांचे मार्गदर्शन लाभणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.

शासनाच्या साहित्य आणि संस्कृती मंडळ व विश्व मराठी परिषद या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने १० ते १६ डिसेंबर २०२० या सप्ताह कालावधीत नव लेखकांसाठी कथा, कविता, संशोधन, अनुवाद, ब्लॉग लेखन अशा वैविध्यपूर्ण विषयांवर निःशुल्क लेखन कार्यशाळांचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्ताने प्रथमच नवलेखकांच्या कार्यशाळांना जागतिक व्यासपीठ मिळणार आहे.

हेही वाचा- शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेत विशेष काय?

मराठी साहित्यविश्वातील अनेक नवलेखक या ऑनलाईन लेखन कार्यशाळांच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले जाणार आहेत. मराठी साहित्यातील समृद्ध कथा, कविता, नाटक, कादंबरी, बालवाङ्मय व ललितगद्य प्रकारांत आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रवेश करणाऱ्या नवलेखकांना ज्येष्ठ प्रतिभावंत साहित्यिकांचे या निमित्ताने मार्गदर्शन लाभणार आहे. अशी माहिती मराठी भाषा विभागामार्फत देण्यात आली आहे.

भागवत परंपरेतल्या सप्ताहातून वारकरी जसे संताच्या सहिष्णू आणि समताधिष्ठित शिकवणुकीची ऊर्जा घेऊन बाहेर पडतात, तशीच लेखनाची, सृजनाची नवी उर्मी व ऊर्जा, प्रेरणा घेऊन या कार्यशाळेतून नवलेखक बाहेर पडतील, असा आशावाद सुभाष देसाई (subhash desai) यांनी व्यक्त केला. (maharashtra government organised free seminar for new marathi writers)
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा