Advertisement

बेदरकारपणे वाहन चालवणे अजामीनपात्र गुन्हा ठरवणार

महाराष्ट्र सरकार या कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार आहे.

बेदरकारपणे वाहन चालवणे अजामीनपात्र गुन्हा ठरवणार
SHARES

बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्या आणि परवाना नसताना मद्यप्राशन करणाऱ्या सार्वजनिक वाहतूक सेवेतील चालकांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आला.

हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा कायदा अधिक कठोर करण्याचे सांगितले आहे. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, चालकांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांचा जीव जाऊ नये, यासाठी कठोर कायदेशीर कारवाई आवश्यक आहे.

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीत पोलिस महासंचालक रजनीश सेठ, गृह विभागाचे प्रधान सचिव, अतिरिक्त पोलिस परिवहन महासंचालक रवींद्र सिंघल, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आदी उपस्थित होते.

बेदरकार आणि मद्यधुंद वाहन चालवल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे निष्पाप प्रवाशांचा बळी जात आहे.

2021 मध्ये अतिवेगामुळे झालेल्या अपघातांची संख्या 20 हजार 860 असून यामध्ये 9829 जणांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरविण्याच्या गृह विभागाच्या प्रस्तावावर बैठकीत चर्चा झाली.

सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या वाहनांमध्ये चालकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात होऊन प्रवाशांचा मृत्यू झाल्यास चालकांवर प्रभावी कारवाई होणे अपेक्षित आहे. त्यासाठी या संदर्भात कायद्यात सुधारणा करायला हवी.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, परवान्याशिवाय वाहन चालवणाऱ्यांना आणि दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना कायद्याच्या कक्षेत आणले पाहिजे.



हेही वाचा

दक्षिण मुंबईत हातगाड्या आणि मालाच्या लोडिंग-अनलोडिंगवर बंदी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा