Advertisement

कोकण हापूसच्या नावाने फसवणूक? राज्य सरकार करणार कारवाई

काही विक्रेते हापूस आंब्याच्या नावाखाली इतर जातीचे आंबे विकून ग्राहकांची फसवणूक करतात. या फसवणुकीला गांभीर्याने घेत, अशा विक्रेत्यांविरूद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला आहे.

कोकण हापूसच्या नावाने फसवणूक? राज्य सरकार करणार कारवाई
SHARES

फळांचा राजा आणि कोकणचा ट्रेड मार्क असलेला हापूस आंबा राज्यभरातील बाजारपेठांमध्ये दाखल झाला आहे. याच जोडीला आंब्यांच्या इतर जातीही विक्रीला उपलब्ध झाल्या आहेत. आंब्यांच्या इतर जातींपैकी चवीला अव्वल असलेल्या हापूस आब्यांची बाजारात मोठी मागणी असल्याने हा आंबा चढ्या किंमतीला विकला जातो. हीच संधी हेरून काही विक्रेते हापूस आंब्याच्या नावाखाली इतर जातीचे आंबे विकून ग्राहकांची फसवणूक करतात. या फसवणुकीला गांभीर्याने घेत, अशा विक्रेत्यांविरूद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला आहे.  

हापूस आंब्यासोबतच आम्रपाली, केशर, पायरी, रायवळ, लंगडा, दशहरी आंबा देखील मोठ्या प्रमाणात विकला जातो. परंतु काही विक्रेते हापूस आंब्याशी साधर्म्य असलेले आंबे चढ्या दराने ग्राहकांना विकून त्यांची फसवणूक करतात. सर्वसामान्य ग्राहकांना देखील अस्सल हापूस आंब्याची पारख कशी करायची याची माहिती नसल्याने ते देखील भामट्या विक्रेत्यांवर विश्वास ठेवून त्याच्या जाळ्यात अडकतात. अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी अधिकाऱ्यांना कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.

आंबा हा शेतमाल ज्या राज्यातून व ज्या नावाने त्याची आवक होईल. त्याच नावाने त्याची विक्री करावी, परराज्यातून आंबा हा शेतमाल त्या राज्याच्या व आंब्याच्या जातीने विक्री होत नसल्याचं आढळून आल्यास कारवाई करण्याचे निर्देश कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत.

हेही वाचा- चहा प्या आणि कप खा!

कृषी मंत्री यांच्या दौऱ्‍या दरम्यान इतर प्रकारचा आंबा हा “कोकण हापूस” म्हणून सगळीकडे विकला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची व ग्राहकांची फसवणूक होत आहे, असे सिंधुदुर्गचे आमदार  वैभव नाईक यांनी निदर्शनास आणून दिले होते. याबाबत कृषी मंत्री यांनी पणन मंत्री बाळासाहेब पाटील, यांच्याशी संवांद साधून निदर्शनास आणून दिलं.

कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर याचा परिणाम होत असून ग्राहकांची यात मोठ्या प्रमाणात फसवणूक होत होती. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पणन मंत्री यांच्या सुचनेनूसार कृषी उत्पन्न बाजार समिती, मुंबई यांनी १२ एप्रिल २०२१ रोजी परिपत्रक जारी केलं आहे.

याबाबतची दक्षता घेण्यात यावी व अशाप्रकारे तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ नियम १९६७ व त्याखालील उपविधीतील तरतूदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

(maharashtra government will take strict action against fake alphonso mango seller)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा