Advertisement

पैलवानांनाही मिळणार पेन्शन...!


पैलवानांनाही मिळणार पेन्शन...!
SHARES

कुस्तीची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रातल्या मल्लांनी जगभर नावलौकिक मिळवला आहे. यामुळे कुस्तीला उर्जितावस्था आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून पैलवानांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.


या मागण्या केल्या

महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी मंत्रालयात मुख्यमंत्र्याची भेट घेतली. यावेळी दीनानाथ सिंह यांनी पैलवानांना वाढीव पेन्शन, एसटीचा प्रवास मोफत मिळावा, शासकीय विश्रामगृहात सोय व्हावी आणि वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, अशा मागण्या मांडल्या.


'शासन सकारात्मक निर्णय घेईल'

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तीनवेळा महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी पैलवानांना पोलीस उपनिरीक्षकऐवजी पोलीस उपअधीक्षक करण्याचा निर्णय शासनाने घेतला. पैलवानांच्या कुटुंब निवृत्तीबाबत क्रीडा विभागाने आराखडा तयार करावा. पेन्शनसाठी वयाची अट न टाकता प्रस्ताव तयार करावा. शिवाय पैलवानांच्या इतर मागण्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असं त्यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा