Advertisement

नियमावलीत बदल; ५० टक्के क्षमतेन व्यायामशाळांना परवानगी

राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकारने नवे निर्बंध जाहीर केले.

नियमावलीत बदल; ५० टक्के क्षमतेन व्यायामशाळांना परवानगी
(Representational Image)
SHARES

राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकारने नवे निर्बंध जाहीर केले. रविवारी मध्यरात्रीपासून हे नवे नियम राज्यात लागू करण्यात आले असून रात्रीची संचारबंदी लागू झाली. मात्र केशकर्तनालयांना परवानगी देताना व्यायामशाळा व ब्युटी सलून बंद ठेवल्याबद्दल टीका झाल्यानंतर मास्क बंधन व ५० टक्के मर्यादेसह व्यायामशाळा व ब्युटी सलून सुरू ठेवण्यास परवानगी देणारा सुधारित आदेश सरकारने रविवारी जारी केला.

सरकारनं राज्यात नवे निर्बंध लागू करताना केशकर्तनालयांना ५० टक्के क्षमतेसह सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. सुरक्षा नियम व मास्क वापराची सक्ती व दोन्ही लस मात्रा घेतलेल्या कर्मचाऱ्यांनाच कामाची मुभा अशा अटींसह ही परवानगी देण्यात आली होती.

मात्र त्याच वेळी ब्युटी सलून व जिम म्हणजेच व्यायामशाळा बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकारच्या निर्बंधांमधील या विसंगतीवर बोट ठेवत लोकांनी या निर्णयावर टीका केली. केशकर्तनालय व ब्युटी सलूनमधील सेवा एकाच प्रकारच्या असताना दोघांना वेगळा न्याय का असा सवाल करण्यात आला. त्यामुळे रविवारी सरकारने सुधारित आदेश काढला. त्यात ब्युटी सलून आणि व्यायामशाळांना ५० टक्के क्षमतेसह, मस्कचा उपयोग करून व पूर्ण लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांमार्फत सेवा देता येईल, असे स्पष्ट करण्यात आले.

ब्युटी सलूनचा समावेश केशकर्तनालय या गटात करण्यात येईल. त्यांनाही क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीत सलून उघडे ठेवण्याची परवानगी असेल व सोबतच केशकर्तनालयासाठीचे नियम लागू असतील. या आस्थापनांमध्ये मास्क काढण्याची गरज नाही अशा सेवेचा लाभ केवळ पूर्णपणे लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच घेता येईल.

त्याचप्रमाणे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या दोन्ही लस मात्रा पूर्ण झालेल्या असणे बंधनकारक असेल. व्यायामशाळांनाही ५० टक्के क्षमतेचे व मास्कच्या वापराचे व संपूर्ण लसीकरणाचे बंधन असेल असे राज्य सरकारने सुधारित आदेशात स्पष्ट केले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा