Advertisement

गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंतीनिमित्त १०० रुपयांत आनंदाचा शिधा मिळणार

राज्य सरकारने दिवाळी तसेच गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या दिवशी आनंदाचे शिळे देण्याचा निर्णय घेतला आहे.

गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंतीनिमित्त १०० रुपयांत आनंदाचा शिधा मिळणार
SHARES

गुढीपाडवा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याचा लाभ १ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना होईल.

आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून

अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना १ किलो रवा, १ किलो चनाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील १ महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉसद्धारे १०० रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाईल. ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाईल.

२०२२ मध्ये दिवाळी सणानिमित्त शिधाजिन्नस खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत २७९ प्रति संच या दरानुसार ४५५ कोटी ९४ लाख आणि इतर अनुषंगीक खर्चासाठी १७ कोटी ६४ लाख अशा ४७३ कोटी ५८ लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.

जलसंपदा विभागाबाबतचे निर्णय

  • उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देणार
  • ५१७७ कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता
  • १८२ गावांना सिंचनाचा लाभ

    हा आनंदाचा शिधा देण्याकरिता आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलद्धारे २१ दिवसांऐवजी १५ दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.



हेही वाचा

सातांक्रुझ-चेंबुर रस्त्यावरील वाहतूककोंडी दूर होणार

चर्चगेट स्टेशनचे नाव बदलणार?

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा