Advertisement

सातांक्रुझ-चेंबुर रस्त्यावरील वाहतूककोंडी दूर होणार

यामुळे प्रवासाचा वेळ १५ ते २० मिनिटांनी कमी होईल.

सातांक्रुझ-चेंबुर रस्त्यावरील वाहतूककोंडी दूर होणार
SHARES

सातांक्रुझ-चेंबुर रस्त्यावरील वाहतूककोंडी लवकरच दूर होणार आहे. या उड्डाणपुलामुळं कपाडिया नगर जंक्शनपासून पश्चिम द्रुतगती एक्स्प्रेसवरुन कुर्लाला लवकर पोहोचणे शक्य होणार आहे. या उड्डाणपुलाची लांबी ३.८ किलोमीटर असून एकूण ४१५ कोटींचा खर्च आला आहे.

कधी सुरू होणार?

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) ते लाल बहादूर शास्त्री मार्ग जंक्शन आणि हंस भुग्रा जंक्शन ते अहमद रझा चौक या फ्लायओव्हरचा काही भाग फेब्रवारी महिन्याच्या अखेरीस खुला केला जाईल, अशी शक्यता आहे. प्रकल्पाचा पहिला टप्पा कुर्ला बस डेपो ते वाकोला- BKC लवकरच सुरू केला जाईल.

15 ते 20 मिनिटात प्रवास शक्य

तर, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाकोला उड्डाणपुलाशी जोडला जाणारा दुसरा टप्पा काहीवेळाने लवकरच पूर्ण होईल. हा प्रकल्प ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील चेंबूरला वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेला वाकोल्यासोबत जोडतो. एमएमआरडीएच्या अहवालानुसार, यामुळे प्रवासाचा वेळ १५ ते २० मिनिटांनी कमी होईल.

कुठल्या मार्गांना जोडतो

सीएसटी रोड, कलिना, हंसभुग्रा मार्ग, वेस्टर्न एक्स्प्रेस मार्ग, वाकोला जक्शंन, या मार्गांना जोडतो.

सांताक्रुझ- चेंबूर लिंक रस्त्यावरील कोंडी कमी करण्यासाठी एमएमआरडीएने विविध उड्डाणपुलांची उभारणी केली आहे. त्यातील दोन उड्डाणपुलांचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. आता या प्रकल्पातील तिसऱ्या उड्डाणपुलाचे उद्घाटन होणार आहे.  


हेही वाचा

मध्य रेल्वे मार्गावरील उपनगरीय लोकल ट्रेनच्या वेळेत बदल, पहा नवीन टाईमटेबल

गोरेगाव मेट्रो स्टेशनला राम मंदिर रेल्वे स्टेशनशी फूटब्रिजद्वारे जोडणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा